सोन्याच्या किमतीत घसरण ? आता दर वाढणार की कमी होणार?
A Drop in Gold Prices? Will Rates Rise or Fall Now?

इराणवर अमेरिका आणि इस्रायल कडून सातत्याने हल्ले सुरू आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणही ड्रोन हल्ल्यांद्वारे आपली ताकद दाखवत आहे. या युद्धाला आता सुमारे 15 दिवस झाले आहेत.
मात्र यावेळी एक वेगळी आणि लक्षवेधी बाब समोर येत आहे. अशा संकटाच्या काळात साधारणपणे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होते, पण इराण आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर तसे होताना दिसत नाही.
युद्धामुळे गॅस टंचाई आता मोबाईल नेटवर्कही गायब ?
सामान्यतः जेव्हा मोठे युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय राजकीय तणाव वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोने खरेदी करतात आणि त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. मात्र सध्या सोने आणि चांदीच्या किमतीत उलट घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.
इराणसोबत 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे 5426 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होते. मात्र मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण होऊनही त्याच्या किमतीत घसरण होऊन ते सुमारे 5108 डॉलर प्रति औंस इतके झाले आहे.
भारतातील किमतींचा विचार केला तर Multi Commodity Exchange of India वर 28 फेब्रुवारीला सोने सुमारे 1.67 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होते.
फारुख अब्दुल्लांवर जीवघेना हल्ला,हल्लेखोराला अटक ,पाहा LIVE VIDEO
मात्र आता त्यात घट होऊन ते सुमारे 1.59 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे. याचप्रमाणे चांदीच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे.
28 फेब्रुवारीला एमसीएक्सवर चांदी सुमारे 2.89 लाख रुपये प्रति किलो या पातळीवर होती, जी 13 मार्चपर्यंत घसरून सुमारे 2.62 लाख रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
अमेरिका वाकला पण इराण झुकला नाही, उलट नडला, मांडला ३ अटींचा प्रस्ताव
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, युद्ध असूनही सोने-चांदीच्या किमतींमध्ये मंदीचे मुख्य कारण यू.एस. डॉलर निर्देशांक (U.S. Dollar Index) मध्ये मजबुती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत असताना सोने खरेदी करणे महाग होते.
त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सोने आणि चांदीची मागणी कमी होते. एकंदरीतच युद्धजन्य परिस्थिती असूनही कच्च्या तेलाच्या किमती आणि मजबूत अमेरिकी डॉलर यांमुळे सध्या सोने-चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे.
स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; रस्त्यावर नोटांचा खच पडला








