झिरवळांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्यानेच ट्रॅप लावला
It was the former minister himself who set a trap to ensnare Zirwal.

विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये झिरवाळ यांच्यासोबत पवन यादव नावाचा तृतीयपंथी दिसत असून, यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिका वाकला पण इराण झुकला नाही, उलट नडला, मांडला ३ अटींचा प्रस्ताव
प्रसारित झालेली ही चित्रफीत सुमारे सात महिन्यांपूर्वीची असल्याचे बोलले जात आहे. शासकीय निवासस्थानातील या दृश्यांमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा झिरवाळ यांच्यासोबत बिछान्यावर बसलेला दिसत आहे.
तसेच त्यांच्या शेजारी खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती अशा परिस्थितीत दिसल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; रस्त्यावर नोटांचा खच पडला
राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या एका कथित व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणाची नरहरी झिरवाळ यांना पूर्ण कल्पना असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरवाळ यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चा केली आहे. पक्षात सध्या मंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक असून, त्या स्पर्धेतूनच झिरवाळ यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आता राजकीय गोटात रंगू लागली आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण ? आता दर वाढणार की कमी होणार?
पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी घेतलेल्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची आग्रही मागणी करणारे झिरवाळ हे पहिले नेते ठरले होते.
तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. मात्र, आता ही चित्रफीत समोर आल्यानंतर झिरवाळ यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
युद्धाचा परिणाम : अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण
या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जर ही कारवाई झाली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला,
तर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्रीपद सोडावे लागणारे झिरवाळ हे पक्षाचे तिसरे मंत्री ठरतील. या सर्व घडामोडींमुळे एकलहरे आणि परिसरात तसेच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अवकाळीचे सावट, महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
नरहरी झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.
त्यावेळीच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
RSS वर बंदी घाला, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी
विधानसभा उपाध्यक्ष आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.
या सगळ्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे झिरवाळ यांचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले त्यांना अडकवण्यासाठी कुणी प्लॅनिंग केलं होतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही
अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी, झिरवाळ यांना अडकवण्यसाठी एका माजी मंत्र्यानेच ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, ‘ सरकारमधल्या एका माजी मंत्र्यालाच झिरवाळ यांची जागा रिकामी करायची आहे, त्यासाठी एक मोठे नाव समोर आले आहे.
झिरवाळ यांची जागा झाली तरच सरकारमध्ये त्यांना पुन्हा जागा मिळू शकते, त्यासाठी हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.’
जे सरकारमध्ये नको आहेत, त्यांना टार्गेट केलं जात आहे. प्रत्येकाला स्वत:साठी जागा रिकामी करून घ्यायची आहे, त्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
यात एका मंत्र्याची विकेट पडली की दुसरा टपूनच बसलेला असतो. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढायली तिसराही लाईनमध्ये बसलेला आहे. याअंतर्गत हे सगळं घडत आहे.
मी कालच बोललो होतो की, पेनड्राईव्ह समोर आल्यानंतर किमान तीन मंत्र्यांचे विकेट पडू शकतात. व्हिडीओ पुढे आले तर तेही पदावर राहू शकणार नाहीत.
मुंबईतील 40 जणांनी केली इच्छामरणाची मागणी ,काय आहे कारण ?
रुपाली चाकणकर यांनी धुतले, तर त्यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण त्यांच्यापेक्षाही अधिक विचित्र व्हिडीओ त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत.
समोर आलेले व्हिडीओ हे फक्त मोबाइलमधले आहेत. लॅपटॉपमधले आहेत. पण खरा पेनड्राईव्ह अजून समोर आलेला नाही. सोयीच जेवढं आहे, तेवढंच काढून दाखवलं जात आहे.”असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणात केला आहे.
सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त
नरहरी झिरवाळ यांच्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते.
त्यावेळीच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता ही नवीन चित्रफीत समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून,
युद्धामुळे सोयाबीनच्या दरात उसळी ,भाव आणखीन वाढणार
झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अद्याप नरहरी झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.









