सोनं अजून किती स्वस्त होणार?

 

 

मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतींवर मोठा दबाव पाहायला मिळाला आहे. Kedia Commodity Researchच्या अहवालानुसार या कालावधीत सोन्याच्या किमतीत सुमारे 19.5% इतकी मोठी घसरण नोंदवली गेली असून ही मागील 50 वर्षांतील सर्वात मोठ्या घसरणींमध्ये गणली जात आहे.

सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त

चांदीच्या किमतीतही कमजोरी कायम राहिली असून दोन्ही धातूंमध्ये सातत्याने विक्रीचा दबाव दिसून आला. यामागे गुंतवणूकदारांनी ETF मधून पैसे काढणे आणि नफावसूली करणे हे मुख्य कारण ठरले आहे.

 

घसरणीची प्रमुख कारणे
अहवालानुसार या घसरणीमागे अनेक महत्त्वाचे मॅक्रो-इकॉनॉमिक घटक कारणीभूत आहेत. यात ETF आउटफ्लो, मजबूत डॉलर आणि वाढणारे बॉन्ड यील्ड्स यांचा समावेश आहे.

झिरवळांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्यानेच ट्रॅप लावला

तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणामुळेही दबाव वाढला आहे. 2026 मध्ये व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या असून दरवाढीच्या चर्चाही सुरू आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीसारख्या non-yielding assets चे आकर्षण कमी होत आहे.

 

अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासाठी $4,000 हा महत्त्वाचा सपोर्ट स्तर असून $3,450 हा मजबूत सपोर्ट मानला जातो. तर $5,180 हा रेजिस्टन्स स्तर आहे.

 

देशांतर्गत बाजारात सोन्यासाठी 1,15,000 ते 1,20,000 दरम्यान सपोर्ट असून 1,50,000 च्या आसपास रेजिस्टन्स आहे. त्यामुळे घसरण वाढल्यास सोने 1,20,000 पर्यंत येऊ शकते. मात्र त्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे.

इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात

चांदीच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारात $52 हा सपोर्ट आणि $85 हा रेजिस्टन्स आहे. देशांतर्गत बाजारात चांदीसाठी 1,75,000 सपोर्ट तर 2,75,000

अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की गोल्ड-सिल्वर रेश्यो 65 वरून वाढून 70–75 पर्यंत जाऊ शकतो. याचा अर्थ येत्या काळात चांदीची कामगिरी सोन्याच्या तुलनेत कमजोर राहण्याची शक्यता आहे.

रेशनवर मिळणार रॉकेल

जागतिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही आणि व्याजदर, डॉलर व महागाईशी संबंधित संकेत स्थिर होत नाहीत तोपर्यंत सोने आणि चांदीवर दबाव कायम राहू शकतो.

 

बाजाराची दिशा प्रामुख्याने फेडच्या धोरणांवर आणि जागतिक संकेतांवर अवलंबून राहणार असून नजीकच्या भविष्यात स्थिरतेचे संकेत मर्यादितच दिसत आहेत.

तापमान वाढणार; विजांसह पावसाची शक्यता

 

Related Articles