अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका
Outrage against Donald Trump in America
मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षाचा भडका काही थांबेना. ज्या फटका केवळ जागतिक अर्थव्यवस्थेलाच नाही, तर अमेरिकेतील आर्थिक धोरणांना बसत आहे.
यामुळे देशभरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. याशिवाय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीती आणि सराकरी निर्णयांविरोधात अमेरिकन जनताही आक्रमक झाली आहे.
अशोक खरात सरकारचा माणूस, त्याचासोबत 40 आमदार
शनिवारी (२८ मार्च २०२६) अमेरिकेतील ५० हून अधिक शहरांमध्ये शेकडो लोक रस्त्यांवर उतरले आहे. या आंदोलनांमध्ये No Kings ची घोषणाबाजी सुरु आहे.
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जागकतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या युद्धनितीमुळे सर्वसामान्यांना याचा फटा बसत असून लोकांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे.
घराबाहेर पडणे टाळा,29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका,
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत न्यूयॉर्कपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत हजारो लोकांनी ट्रम्प यांच्या युद्धाच्या धोरणांचा निषेध केला आहे.
शिवाय या आंदोलनाता प्रामुख्याने अमेरिकेतील वाढती महागई, इंधन दर आणि इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाविरोधात बंड पुकारण्यात आला आहे.
युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या मिडटाउन मॅनहॅटनमध्ये आंदोलकांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे. यामध्य ट्रम्प सरकारच्या धोरणांना विरोध केला जात आहे.
इमिग्रेशन धोरणावर लोकांनी कडाडून टीका केली आहे. तसेच इराणविरोधीच्या युद्धाचा भयंकर विरोध होत असून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
एम्बार्केडेरो प्लाझा येथे सिव्हीक सेंटरपर्यंत मोर्चा काढला आहे. यामध्ये युक्रेनचे समर्थन, ट्रान्सजेंडरचे हक्क, विविध सामाजिका मुद्द्यावर फलक घेऊन लोक रस्त्यावर नारेबाजी करत आहेत.
सेंट पॉल येथे रॉक स्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांच्या नेतृत्त्वाखाली एक मोठी रॅली काढण्यात आली आहे. या आंदोलनाला नागरिकांच्या अस्मितेचा लढा संबोधले जात आहे.
अशोक खरात सरकारचा माणूस, त्याचासोबत 40 आमदार
ट्रम्प यांच्या हुकूमशाहीविरोधात नागरिकांनी आणि विरोधाकांनी कडाडून टीका केली आहे. ट्रम्प हुकूमशाह बनण्याचा प्रयत्न करत असून याला जनतेने विरोध करत लोकशाहीच्या समर्थनार्थ उभे राहिल्याचे म्हटले आहे. युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. तसेच इंधन दरातही वाढ होते.
यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाण ट्रम्प समर्थक आणि आंदोलकांमध्ये वादही पेटला आहे. अमेरिकेत नो किंग्स आंदोलना सलग तिसऱ्यांदा होत असून ट्रम्प विरोधात जनतेचा अंसतोष प्रचंड वाढत आहे.
इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात









