शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरातचा हात?
Did the 'Fake Guru' Ashok Kharat have a hand in the Shalarth ID scam?

राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचा सहभाग असल्याचा संशय आता वर्तवण्यात येत आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की खोटा, याचा तपास पोलीस करणार आहेत. त्यामुळे शालार्थ आयडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत धक्कादायक माहिती येणार समोर असल्याची शक्यता आहे.
आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेला भोंदू अशोक खरात आता आणखी एका गंभीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या भावाला मिळालेल्या आयडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 2022 साली तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची चर्चा आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
नागपुरात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, रुग्णालयात दाखल
अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा,
याबाबत आता संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा असून शिक्षण विभागातील काही फाईल्सही अशोक खरातच्या दबावाखाली मंजूर केल्याची चर्चा रंगली आहे.
सरसगट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही :पात्रतेबाबत अजूनही संभ्रम
नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिलीप खरात याची चौकशी होऊ शकते,
तसेच या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच अशोक खरातशी संबंधित काही व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.
कौन बनेगा करोडपती मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदारला अटक
अशोक खरात आणि दीपक केसरकर यांच्यातील संबंधांमुळेच त्याला शालार्थ आयडी मिळाल्याची चर्चा शिक्षण विभागात जोर धरत आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नावही समोर आलं होतं. त्यामुळे त्यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसंच शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींसह त्यांनाही एसआयटीकडून समन्स बजावण्यात आलं असून चौकशी होणार आहे.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात निलेश चाकणकरांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.







