भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Former Indian cricketer Mahendra Singh Dhoni cheated of crores of rupees

 

 

 

 

 

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. धोनीच्या व्यावसायिक भागीदाराने 15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

 

 

धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सौम्या बिस्वास आणि मिहिर दिवाकर यांच्याविरोधात रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

 

 

जागतिक स्तरावर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी दिवाकरने एमएस धोनीसोबत करार केला होता. त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या होत्या, मात्र मिहीर दिवाकर यांनी दिलेल्या अटी पाळल्या नाहीत.

 

 

दिवाकरला अर्का स्पोर्ट्स फ्रँचायझीची फी भरायची होती आणि नफा वाटून घ्यायचा होता, पण त्याने तसे केले नाही. यामुळे धोनीला खूप त्रास सहन करावा लागला. यामुळे धोनीचे 15 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

 

अटींचे पालन न केल्यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्सला नोटीस पाठवली होती. यासोबतच अर्का स्पोर्ट्सला दिलेले अधिकारही रद्द करण्यात आले. धोनीने त्याच्या बिझनेस पार्टनरला अनेक नोटिसा पाठवल्या होत्या, पण तरीही हे प्रकरण मार्गी लागले नाही.

 

 

 

विधी असोसिएट्सच्या माध्यमातून एमएस धोनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दयानंद सिंग यांनी ही माहिती दिली आहे. अर्का स्पोर्ट्सने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे एमएसडीचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *