एकनाथ शिंदेंनी दिला इशारा म्हणाले ,लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार

Eknath Shinde warned that there will be a political earthquake after the Lok Sabha result

 

 

 

 

महाराष्ट्रातील अटल बिहारी वाजपेयी शिवारी-न्हावा शेवा अटल पुलाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली.

 

 

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

 

 

 

एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 21.8 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव देण्यात आले आहे.

 

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा गेमचेंजर प्रकल्प असल्याचे शिंदे म्हणाले. अटल सेतूमुळे वेळ वाचणार आहे. दोन तासाचा प्रवास आता 20 मिनिटात होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलं आणि त्यांनीच लोकार्पण देखील केलं.

 

 

 

अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, अशी घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यात अबकी बार 45 पार ही आमची जबाबदारी असल्याचे शिंदे म्हणाले.

 

 

लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भूकंप येणार आहे. हा भूकंप विरोधी पक्ष सहन करु शकणार नाहीत, असा इशारा देखील शिंदेंनी दिला.

 

 

 

विकासाची विरोधी लोकांनी नेहमी पोटदुखी होत असते. रावणाच्या अंहकाराचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी रामसेतू तयार केला होता. तसेच ह्या सेतूमुळे अहंकारी लोकांचा नाश होणार आहे.

 

 

अटल सेतूमुळे तिसरी मुंबई विकसित होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. देशाचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे. विकासासाठी केंद्र सरकार आमच्यासोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *