काँग्रेसला महविकास आघाडीचे जागावाटप होणार “या” फार्मुल्याने
With this formula, seats will be allotted to the Congress

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या प्राथमिक बोलणीत काँग्रेसच्या वाट्याला राज्यातील ४८ पैकी २२ मतदारसंघ येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
असे असले तरी विदर्भातील रामटेक आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा सोडला नसल्याचे समजते.
रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने दोन वेळा तर यवतमाळ-वाशीमध्ये भावना गवळी सातत्याने निवडून येत आहेत. हे दोन्ही खासदार आता शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
या दोन्ही जागा सोडल्यास विदर्भातील प्रतिनिधित्व संपुष्टात येईल अशी भीती शिवसेनेला वाटत आहे. असे असले तरी या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या विजयात भाजपचा वाटा मोठा आहे.
येथे काँग्रेसला विजय मिळवता आला नसला तरी मतांची टक्केवारी चांगली आहे. जय आणि पराजयात काही हजारांचाच फरक आहे. रामटेकमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक निवडून आले होते.
हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनीच तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे रामटेक आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून लढणाऱ्या इच्छुकांचे टेंशन वाढले आहे.
जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक दिल्ली येथे घेण्यात आली. राज्यस्तरावरही बऱ्यापैकी बोलणी झाली आहे. ज्या पक्षाच्या जेथे प्रभाव तिथे त्यांच्यासाठी जागा हा फार्मुला जागावाटपासाठी वापरण्यात येणार आहे,
तसे करण्याची तिन्ही पक्षांनी तयारी दर्शवली आहे. काँग्रेसने विभागानिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अमरावती आणि नागपूर विभागीच बैठकसुद्धा झाली आहे.
या दोन्ही नेत्यांनी जागा वाटप करताना काही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडीत विदर्भातील अमरावती आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते.
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अमरावती येथून निवडून आलेल्या खासदार नवनित राणा यांनी भाजपचा भगवा हाती घेतला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी येथे नव्या उमेदवाराचा शोध घेत आहे. गोंदिया-भंडारा प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राखीव होते.
त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. ते राज्यसभेवर आहेत. दुसरा सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे येथे नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा गृह जिल्हा आहे. त्यामुळे येथे काँग्रेसच दावा करणार असल्याचे समजते.