ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या अधिकाऱ्यांना ठेवीदारांनी शेतात डांबून ठेवले

The officials of Gnanaradha Multistate were kept in the field by the depositors

 

 

 

 

 

जालन्याच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या परतुर शहरातील शाखा मागील आठ दिवसांपासून बंद आहेत. यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

 

यामुळे आपल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी ठेवीदारांनी अधिकाऱ्यांना शेतात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
जालन्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या परतुर शहरातील शाखा आठ दिवसांपासून बंद असल्याने

 

 

 

 

ठेवीदारात संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात या सोसायटीचे अध्यक्ष  कुटे यांच्यावर  छापा पडल्याने ही बँक डबघाईला आल्याची माहिती समोर आली.

 

 

 

त्यामुळे सर्व ठेवीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक महिन्याच्या आत सर्वांचे पैसे परत करू; असे आश्वासन संचालक मंडळाकडून देण्यात आले होते.

 

 

त्यानंतर तीन महिने ही शाखा सुरळीत चालली. मात्र प्रत्येक वेळी आपले पैसे परत मिळावे, यासाठी ठेवीदार चकरा मारत होते. पण त्यांच्या हाती निराशा आली.

 

 

 

दरम्यान आज ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कर्मचारी तीन महिन्यानंतर परतूर या ठिकाणी दाखल झाले. मात्र ठेवीदारानी पैसे परत मिळावे,

 

 

 

म्हणून या अधिकाऱ्यांना चक्क शेतात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या बँकेत परतूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात व्यापारी, नोकरदार, शेतकरी यांच्या ठेवी आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *