अजितदादांकडून आर आर पाटील आबाच्या पुतळ्यास हार घालण्यास नकार

Ajitdad refused to garland the statue of RR Patil Aba

 

 

 

 

यावेच लागतयं असा आग्रह आर आर आबांच्या कार्यकर्त्यांनी धरताच उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्याच्या महत्वाच्या निर्णयात सक्रिय मदत केली.

 

 

तरीही तुम्ही माझी काय राखली? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावमध्ये आर आर आबा गटाच्या कार्यकर्त्यांचा आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास नकार दिला.

 

 

सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगली जिल्ह्याचा धावता दौरा केला. विटा येथे स्व.आमदार अनिल बाबर यांच्या घरी सांत्वनपर भेट देउन सांगलीला परतत असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले.

 

 

अगदी तासगावच्या वेशीवर खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांनीही स्वागत केले.यानंतर तासगाव बाजार समितीजवळ आल्यानंतर

 

 

पवार यांची मोटार आरआर आबा पाटील गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विश्‍वास पाटील, अमोल शिंदे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादांची मोटार अडवून आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा

 

 

आणि आमचा सत्कार स्वीकारा असा आग्रह करीत होते.यावेळी मी आताच सांत्वन भेट केली असल्याने अशावेळी सत्कार नको असे सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.

 

 

मात्र, कार्यकर्त्यांनी यायलाच लागतय असा आग्रह धरताच दादांनी खडसावून सांगितले, आबांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रदेशाध्यक्ष करण्यासारख्या महत्वाच्या निर्णयात माझा सहभाग महत्वाचा होता.

 

 

माझ्यासोबत याल म्हणून वाट पाहिली, मात्र आला नाहीत, तुम्ही माझी काय राखली अशा शब्दात आदर सत्कार स्वीकारण्यास आणि आबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यास ठाम नकार देत पुढे रवाना झाले.

 

 

 

यानंतर अवघ्या शंभर मीटर अंतरावर दादा गटाचे कार्यकर्तै आणि नव्याने नियुक्त केलेले जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील

 

 

व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याठिकाणी मात्र अजितदादांनी थांबून त्यांचा आदरसत्कार स्वीकारत पुढे सांगलीच्या दिशेने मार्गक्रमण केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *