पुढचे तीन दिवस पावसाचे;”या” जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पडणार पाऊस
Next three days of rain; rain will fall with lightning in "this" district

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशासह राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
यासोबतच तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होईल, असंही आयएमडीकडून सांगण्यात आलंय. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सुरू होताच देशासह राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागला आहे. नागरिकांना पहाटे कडाक्याची थंडी आणि दिवसभर उन्हाच्या झळा जाणवत आहेत.
आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याचे म्हणणे आहे की, १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान मध्य भारतासह पूर्व भारतातील तापमानात वाढ होईल. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने
काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. आजपासून दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत राज्यातील पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती शेअर केली आहे.
होसळीकर यांच्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
याशिवाय विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट,
शनिवारी गडगडाटी वादळांवर सोबत विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता.
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 9, 2024
हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत वादळी वारे वेग 30-40 किमी प्रति तास जालना , हिंगोली आणि परभणी जिल्हे येथे घडण्याची शक्यता, असं होसळीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.