आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले,मी आदित्य ठाकरेला मित्र समजत होतो पण …..

MLA Zeeshan Siddiqui said, I used to consider Aditya Thackeray as a friend but...

 

 

 

 

 

वांद्रे परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी अजित पवार यांनी वांद्रे येथील झिशान सिद्दीकी

 

 

 

यांच्या कार्यालयात जाऊन पितापुत्रांची भेट घेतली. अजित पवार कार्यालयात आल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी त्यांचा अगत्याने पाहुणचार केला.

 

 

त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या. थोड्यावेळ्यासाठी झिशान सिद्दीकीही आजच वडिलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली.

 

 

 

मात्र, बाबा सिद्दीकी आणि अजित पवार कार्यालयातून निघून गेल्यानंतर झिशान यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.

 

 

 

 

मात्र, यावेळी झिशान सिद्दीकी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कार्यक्रमांच्या निमंत्रणांपासून ते निधीवाटपात आपल्याबाबत कशाप्रकारे दुजाभाव झाला,

 

 

 

याविषयीची खदखद बोलून दाखवली. एवढेच नव्हे तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेतृत्त्वाच्या बोटचेप्या भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली.

 

 

बाबा सिद्दकी यांना शुभेच्छा असतील ते माझे वडील आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस मोठा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझ्या कार्यालयात आलेत ही आनंदाची गोष्ट आहे.

 

 

 

मी सध्या काँग्रेस पक्षातच आहे. यापूर्वी एक मुख्यमंत्री होते. ते माझ्या कार्यालयाजवळ कार्यक्रम ठेवायचे पण मला निमंत्रण देखील नसायचं, अशी खंत झिशान सिद्दकी यांनी बोलून दाखवली आहे.

 

 

 

मी काँग्रेस नेतृत्वाकडे याबाबत हा मुद्दा घेऊन गेलो होतो. या जागेवर शिवसेनेची म्हणजेच ठाकरे गटाची नजर आहे. आपण फार काही करु शकत नाही,

 

 

असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, वरिष्ठ नेते तरुण आमदाराला पाठबळ देत नसतील तर दुर्दैवाची गोष्ट आहे. पण तरीही मी काँग्रेसमध्येच आहे.

 

 

 

झिशान सिद्दकी म्हणाले, “महाविकास आघाडी सांभाळण्याच्या नादात काँग्रेस पक्षाचे नुकसान होत आहे. मी जेव्हा आवाज उठवायचो अन्यायाविरोधात तेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते साथ देत नाहीत.

 

 

 

पण अजित पवारांनी मला अर्थमंत्री असताना मदत केली. मी टर्म संपणार म्हणून वाट बघत नाही, मी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या विचारात नाही.

 

 

 

माझे वडील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राहुल गांधी यात्रेत बिझी आहेत. वरिष्ठ नेत्यांशी बोलतोय, पण त्यांचे हात बांधलेले आहेत.

 

 

संजय निरुपम यांच्याबाबत बोलताना सिद्दकी म्हणाले, आम्ही गल्लीतील नेत्यांशी बोलत नाही, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते”, असे झिशान सांगितले.

 

 

 

 

काँग्रेस पक्षाचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

 

 

या पक्षप्रवेशापूर्वी अजितदादांनी बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयाला दिलेली भेट चांगलाच चर्चेचा विषय ठरली. झिशान सिद्दीकी यांनी अजितदादा कार्यालयात आल्यानंतर ज्याप्रकारे लगबगीने त्यांनी सरबराई केली

 

 

 

ती पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे झिशान सिद्दीकीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

 

 

 

 

मात्र, झिशान यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मिळालेल्या सापत्न वागणुकीविषयी

 

 

 

 

आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. विशेषत: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीविषयी झिशान यांनी खंत व्यक्त केली.

 

 

झिशान सिद्दीकी यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करताना म्हटले की, आदित्य ठाकरेंचे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटायचे.

 

 

 

मविआ सरकारच्या पहिल्या वर्षात आदित्य ठाकरे हे आमच्या मैत्रीच्या नात्यात प्रो-अॅक्टिव्ह होते. पण त्यानंत आदित्य यांचा स्वभाव बदलत गेला.

 

 

एकमेकांना फक्त मित्र म्हणणं पुरेसं नसतं. मी अनेकदा मंत्री किंवा अन्य नेत्यांकडे काही कामासाठी जायचो तेव्हा ते म्हणायचे ‘तुम्ही तुमच्या मित्राला सांगा ना.’ ते ऐकून माझी अवस्था विचित्र व्हायची.

 

 

 

मी आदित्यला मित्र मानयचो, पण त्याच्याकडून तसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतरच्या काळात आदित्य पालकमंत्री होता. तरीही माझा किंवा अन्य कोणाचाही फोन आदित्य उचलायचा नाही.

 

 

 

मी त्याला जवळपास ५० वेळा कॉल केले पण आदित्य ठाकरेंनी एकदाही माझा फोन उचलला नाही. मी कार्यक्रमात भेटल्यावर आदित्यला बोलायचोही,

 

 

 

आदित्य यार माझा फोन तरी उचल. मी तुला इतर कोणत्या गोष्टीसाठी फोन करतो का? माझ्या कामासाठी फोन करतो, असे मी त्याला बोललोही. पण जाऊ दे, आदित्य कदाचित खूप बिझी माणूस असेल,असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.

 

 

यापूर्वी एक मुख्यमंत्री असे होते की, माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो.

 

 

 

एकदा तर जाहीर भाषणातही मी त्यांना मलाही मतदारसंघातील कार्यक्रमांचे निमंत्रण देत जा, असे सांगितले होते. अनेकदा माझ्या वाट्याचा निधीही शिवसेनेच्या दुसऱ्या एखाद्या आमदाराला दिला जात असे.

 

 

मी त्यावेळी आवाज उठवायचो पण काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते मला साथ द्यायचे नाही. मात्र, त्यावेळी अर्थमंत्री असलेले अजित पवार मला मदत करायचे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *