अशोक चव्हाणांनी प्रवेशाच्या वेळी भाजपला किती रुपये दिले, जाणून घ्या ?

Know how much rupees Ashok Chavan gave to BJP at the time of entry? ​

 

 

 

 

 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाच्या सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

 

 

राजीमाना दिल्यानंतर त्यांनी आज भाजपात रीतसर प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या राजीमाना आणि भाजपप्रवेशाची चर्चा राज्यासह देशपातळीवर होत आहे.

 

 

 

अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी रीतसरपणे पक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत

 

 

आपल्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना पक्ष प्रवेशाचा अर्ज भरला आणि त्यानंतर प्रवेश शुल्क दिला. हो, अधिक बरोबर, भाजपात प्रवेश करताना अशोक चव्हाण यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पैसे दिले.

 

 

अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश करताना बावनकुळेंच्या हातात किती पैसे दिले. त्यामागचं कारण काय? याचे उत्तर जाणून घेऊ. रुसवे, फुगवे, आरोप, प्रत्यारोप सगळंकाही विसरुन अखेर

 

 

 

अशोक चव्हाण भाजपवासी झाले. चंद्रशेखर बावनकुळेंनी अशोक चव्हाणांचा रीतसर भाजपात प्रवेश करुन घेतला. त्यांनी अशोक चव्हाणांचा प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्मही भरून घेतला.

 

 

 

आता पहिल्यांदा जर कुणी पक्षात प्रवेश करतो. तर त्याला पक्षाच्या सदस्यत्वाची फिस द्यावी लागते. ही फिस 5 रुपये असते. अशोक चव्हाणांनी भापजच सदस्यत्व स्वीकारल्यावर

 

 

त्यांनी ही 5 रुपयांची फिस भरायला चंद्रशेखर बावनकुळे यांना २० रुपयांची नोट दिली. आणि स्वत:चा रितसर भाजपात प्रवेश करुन घेतला.

 

 

 

भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला याचे कारण सांगितले. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे चव्हाण म्हणाले.

 

 

 

यावेळी त्यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या नेत्यांना सुनावलं. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे.

 

 

 

काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर नसल्याचं ते म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *