काँग्रेस आमदाराचा निवडणुकीपूर्वी मृत्यू
Congress MLA dies before election

राजस्थान श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर येथील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
त्यामुळे आता राज्यातील १९९ विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे मानले जात आहे. तसेच या निवडणुकीनंतर आयोगाकडून या जागेच्या निवडणूकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे येथील निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे.
गुरमीत सिंग कुन्नर हे श्रीगंगानगरमधील करणपूरचे आमदार होते आणि काँग्रेसचे उमेदवार देखील होते. गुरमीत सिंग कुन्नर यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गुरमीत सिंग कुन्नर यांना मूत्रपिंडाच्या समस्येमुळे एम्स दिल्लीच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील सरकारच्या काळात कुन्नर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता आणि मंत्रीही झाले होते.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत गुरमीत सिंग कुन्नर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची लढत भाजपचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंह टीटी यांच्याशी होती.
राजस्थान विधानसभा पुन्हा एकदा १९९ च्या फेऱ्यात अडकली आहे. २०१३ आणि २०१८ मध्येही देखीव विधानसभेत १९९ आमदार उरले होते. २०२३ मध्ये काँग्रेसचे सात वेळा आमदार राहिलेले भंवरलाल शर्मा यांचे निधन झाल्यानंतर राजस्थान विधानसभा पुन्हा एकदा १९९ च्या आकड्यात अडकली होती.
राजस्थान विधानसभेबाबत एक मिथक आहे की येथे २०० सदस्य कधीच एकत्र बसत नाहीत, आता काँग्रेस उमेदवाराच्या निधनाने पुन्हा एकदा याबद्दलच्या चर्चेला उधाण आले आहे.
गुरमीत सिंग कुन्नर यांचा जन्म श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर शहराजवळील २५ बीबी गावात झाला. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आमदार गुरमीत सिंग १९९८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले,
त्यानंतर २००८ मध्ये अपक्ष म्हणून आणि २०१८ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. गुरमीतसिंग कुन्नार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८० मध्ये सरपंचपदापासून केली होती.
१९८८ मध्ये ते पंचायत समिती पदमपूरचे प्रमुख झाले आणि १९९५ मध्ये उपजिल्हाप्रमुख झाले. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली.