हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला रामराम

Ramram to Mumbai for diamond traders

 

 

 

जगात विकल्या जाणार्‍या हिऱ्यांपैकी बहुतांश हिरे सुरतमध्ये तयार होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन सुरतमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे.

 

 

4500 कार्यालये असलेल्या आयकॉनिक सुरत डायमंड बाजारामध्ये आजपासून हिऱ्यांचा व्यापार सुरू होत आहे. मुंबईतील 26 व्यापारी सुरतमध्ये कार्यालय स्थलांतरित करणार आहेत.

 

 

 

सुरत डायमंड बोर्सची 135 कार्यालये मंगळवारपासून औपचारिकपणे व्यवसायासाठी उघडली जातील. 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी कायमस्वरूपी कार्यालय बंद केल्यानंतर मुंबईहून सुरतला स्थलांतरित होणार आहेत.

 

 

 

सूरत डायमंड बोर्समध्ये 4300 कार्यालयांचा समावेश असलेल्या सुरतच्या खजोद येथील ड्रीम सिटी येथे बांधले गेले आहे. 10 वर्षांपूर्वी सूरत डायमंड बोर्स बांधकामासाठी काम सुरु करण्यात आले होते.

 

 

 

जगातील सर्वात मोठ्या हिरे व्यवसाय केंद्रात आजपासून 135 हिरे व्यापारी काम करण्यास सुरुवात करतील. मिळालेल्या माहितीनुसार 17 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी डायमंड बाजाराचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत.

 

 

 

2014 मध्ये सुरतमधील काही व्यावसायिकांनी तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली तेव्हा त्यांची इच्छा होती की हिऱ्यांचा व्यवसाय मुंबईतून नव्हे तर सुरतमधून चालवावा

 

 

 

आणि याच ध्येयाने हिरे उद्योगाशी संबंधित असलेले हे सर्व व्यावसायिकांनी आनंदीबेन पटेल यांना समजावून सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की 1000 एकरहून अधिक जमीन त्यांना सरकारने तात्काळ दिली.

 

 

 

वर्षानुवर्षे सुरत शहराला डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. सुरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये कापले जाणारे हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात.

 

 

या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सुरतच्या हिरे कारखान्यांमध्ये कापलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो.

 

 

 

चार ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा दावा फोल? काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या ‘त्या’ ट्विटवर केंद्र सरकारचे मौन
मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ

 

 

असल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. ज्याद्वारे सुरतमध्ये कापलेले हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.

 

 

 

आता असे होणार नाही, कारण सुरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सुरत येथे बांधण्यात आली आहे,

 

 

ज्यामध्ये सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. त्यामुळेच आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सुरतला स्थलांतरित होत आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *