पाहा VIDEO ; मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया,म्हणाले ढगात कुणाला टाटा…?

Watch the VIDEO; Netizens' amazing reactions on Modi's Tejas flight, who is in the cloud...?

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. मोदींच्या या भरारीचे विविध फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

 

 

 

यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी क्रिकेट वर्ल्डकपच्यावेळी नेटकऱ्यांना त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्यावर मिम्स आणि कमेंट्स येत आहेत.

 

 

तेजस आकाशात झेपावल्यानंतर मोदी बाजुला पाहून टाटा करताना दिसत आहेत. तर त्यांच्या बाजुला सर्वत्र ढग आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी मोदी नक्की कोणाला टाटा करताहेत असे सवाल केले आहेत?

 

 

 

तसेच मोदींना ट्रोल करणाऱ्यांना काही नेटकऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसवर टीका करताना एका युजरनं म्हटलं की, काँग्रेसची आयटी सेल आणि डाव्या विचारांच्या ट्रोलर्सनं मोदींच्या एका व्हिडिओवरुन फेक न्यूज पसरवायला सुरुवात केलीए.

 

 

यात त्यांनी म्हटलं की, मोदी ढगांना टाटा करताहेत. पण मोदी ढगांना नाहीतर इतर दुसऱ्या तेजस विमानातील पायलटला बघून टाटा करताहेत.

 

 

 

PM मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली. तसेच तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याचीही त्यांनी यावेळी पाहाणी केली.

 

 

 

यावेळी त्यांनी तेजस विमानात बसून आकाशात भरारी देखील घेतली. मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो. प्रत्यक्ष लढाईसाठा वापरलं जाणार तेजस विमान हे सिंगल सीटर आहे.

 

 

 

तेजस हे भारतीय हवाई दलाचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे, संपूर्ण भारतीय बनावटीचं आहे. कुठल्याही हवामानात हे विमान यशस्वी उड्डाण करु शकतं.

 

 

 

याला LiFT म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर असंही म्हटलं जातं. भारतीय वायुसेनेने HAL ला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे.

 

 

यातील 26 तेजस मार्क-1 आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HAL आता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *