अजित पवार गटाच्या नेत्यामुळे शिंदे गटाचे आमदारांच वाढले टेन्शन !

Due to the leader of the Ajit Pawar group, the MLAs of the Shinde group have increased the tension!

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीला अवघा वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. सांगोला जिल्ह्याचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी

 

 

 

आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केल्याने विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

 

 

ब्रम्हदेव जरी आला तरी मी सांगोल्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार अशी घोषणाच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी केली आहे.

 

 

त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत सांगोला विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केल्याने

 

 

शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत . मागील निवडणुकीत दीपक साळुंके यांचा शहाजीबापूंना पाठिंबा होता.

 

 

 

मात्र, यावेळी दीपक साळुंके यांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे शहाजीबापू काय भूमिका घेताता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी आपली ताकद शहाजीबापू यांच्या मागे उभी केल्यावर बापू काठावर विजयी झाले होते .

 

 

 

गेले साडेतीन वर्षे शहाजी बापू यांच्या सोबत असणाऱ्या दीपक साळुंखे यांनी आता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे सांगताना आता ब्रम्हदेव जरी आला तरी माघार नाही

 

 

अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांसोबत बोलताना घेतली . आता २०२४ची विधानसभा लढवायची हा फायनल निर्णय असून आता यावर पुन्हा चर्चा नाही असे थेट आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत .

 

 

 

त्यामुळे शिंदे गटाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढणार तर आहेत शिवाय याचा थेट फायदा शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना होणार आहे .

 

 

दीपक साळुंकेंच्या घोषणेने सांगोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अजून बापूंनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *