पाहा Video ;काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कार्यकर्त्यांवर जॅम भडकले म्हणाले…..

Watch Video ;Congress President Mallikarjun Kharge called a jam on workers.....

 

 

 

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यात ते आपल्याच कार्यकर्त्यांवर नाराज झाल्याचे दिसत आहेत.

 

 

खर्गे यावेळी इतके भडकले की त्यांनी मंचावरूनच कार्यकर्त्यांना थेट फटकारले. भाषण सुरु असताना कार्यकर्त्यांचा मंचासमोर सुरु असलेला गोंधळ पाहून

 

 

 

मल्लिकार्जुन खरगे संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, काँग्रेस अध्यक्ष म्हणत आहेत की, “शांत बसा, ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर बाहेर जा.” असे बोलू नका. तुला माहीत नाही का?

 

 

 

सुरू असलेल्या या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते बोलत आहेत. आणि तुम्ही ते न ऐकता सतत बोलतच आहात. ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर जा तुमच्या जागेवर.”

 

 

 

ही घटना तेलंगणातील कालवकुर्तीची असल्याचे सांगितले जात आहे, एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की,

 

 

 

नरेंद्र मोदी निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, ‘मी पंतप्रधान झालो तर बाहेरून काळा पैसा आणीन आणि प्रत्येकाला १५ लाख रुपये देईन. पंतप्रधान खोटे बोलतात की खरे बोलतात? हे समजलं का?

 

 

 

यापुढे खर्गे म्हणाले की, ‘दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार असे आश्वासन दिले होते, पण खरचं नोकऱ्या दिल्या का? नाही दिल्या… पंतप्रधानांचे हे दुसरे खोटे आहे.

 

 

 

पीएम मोदी शेतकऱ्यांबद्दल, खतांवर सबसिडीबद्दल बोलत राहिले. केसीआर यांनीही तेच केले. केसीआर कार्यालयात किंवा विधानसभेत बसत नाहीत. तो त्याच्या फार्म हाऊसवर बसतात आणि तिथून कारभार चालवतात. अशा सरकारला उलथून टाकावे लागेल.

 

 

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकर्त्यांवर भडकल्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, हे असामान्य नाही.

 

 

काँग्रेसचे अध्यक्ष असूनही खर्गे यांचा त्यांच्या सर्व जाहीर सभांमध्ये अपमान केला जातो. यावेळी जे त्यांचा अपेक्षित आदर करत नाहीत

 

 

अशा कार्यकर्त्यांवर ते असहायपणे ओरडतात, खरगे दलित आहेत म्हणून काँग्रेस त्यांचा अपमान करत आहे का? असा गंभीर सवालही मालवीय यांनी उपस्थित केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *