सुपरस्टार सलमान खान ला ठार मारण्याच्या धमक्या
Death threats to superstar Salman Khan

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा सध्या त्याच्या टायगर 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
मात्र आता सलमानच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी समोर आली आहे. सलमानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
काही दिवसांपुर्वी पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घरावर रात्री उशिरा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता.
तो सलमानचा मित्र असल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची धमकी त्याला फेसबुकवर देण्यात आली होती. काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोईने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर सलमान खान कोणीही वाचवू शकणार नाही असे सांगितले होते.
आता या प्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याशिवाय पोलिसांनी सलमानला या धमकीची माहिती दिली. ज्या फेसबुक पोस्टमध्ये सलमान खानला धमकी देण्यात आली होती त्याची पोलीस चौकशी करत आहेत.
सलमान खानच्या सुरक्षेबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, नुकत्याच मिळालेल्या धमकीनंतर पोलिस सलमान खानच्या सुरक्षेत बारकाईने लक्ष देणार आहे. त्यांना या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आहे.
गेल्या वर्षी, महाराष्ट्र सरकारने सलमान खानला Y+ श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती. गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाल्यानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती.
सलमानला सतत धमक्या दिल्या जात आहेत. सुरक्षेसाठी सलमान खानसोबत 11 शिपाई नेहमीच उभे असतात. आता या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षेतही वाढ केली.