एकाच वेळी15 शाळा बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी
Threat to blow up 15 schools simultaneously

बेंगळुरू येथे किमान १५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलच्या माध्यमातून शाळांना ही धमकी देण्यात आली आहे.
बसवेश्वरनगर च्या नेपेल आणि विद्याशिल्पा समेच सात शाळांना तसेच येलहंका परिसरातील इतर खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सावधगिरीचा उपाय म्हणून घमकी मिळालेल्या शाळेतील विद्यार्थांना बाहेर काढण्यात आले आणि तपास सुरु केला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकमार यांच्या निवासस्थानासमोर एका प्ले स्कूलला देकील बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता.
पोसिलांनी सर्व शाळांमध्ये शोध घेत आहेत, मात्र अद्याप पोलिसांनी काहीही सापडलेलं नाहीये. दरम्यान हा फेक ईमेल आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.
मागच्या वर्षी देकील बेंदळुरू येथील अनेक शाळांना याच प्रकारे ईपेल पाठवून धमकवण्यात आले होते, तेव्हा देखील ही अफवा असल्याचे निदर्शनास आले होते.
आज सकाळी शाळेच्या प्रशासनाने मेल चेक केले तेव्हा या धमकीबद्दल माहिती समोर आली. बेंगळुरूचे पोलिस कमिश्नर बी दयानंद यांनी सांगितले की बॉम्ब शोधक पथक परिसरात तपास करत आहेत.
ज्या शाळांना धनाकी मिळाली होती त्यापैकी एका शाळेने पालकांना मेसेज देखील पाठवला होता की, सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही मुलांना घरी परत पाठवत आहोत. यानंतर चिंतेत पडलेल्या पालकांनी शाळेच्या परिसरात मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली.
यापूर्वी १९ जुलै २०२२ रोजी बेंगळुरूमध्ये ३० शाळांना देखील अशीच धमकी देण्यात आली होती. ८ एप्रील २०२२ रोजी देखील ६ शाळांना धमकी देणार मेसेज पाठवण्यात आला होता.
या सर्व धमक्या खोट्या निघाल्या होत्या, गेल्या नोव्हेंबर मध्ये होसुर रोड येथील टाटा कंसल्टेंसी सर्विसेसच्या ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता नौकरीहून काढण्यात आलेल्या एका माजी कर्मचाऱ्यामने रागाच्या भरात ही धमकी दिली होती.
या प्रकरणामध्ये २० मे २०२२ रोजी एका अनोळखी व्यक्तीने फोन करून बेंगळुरू कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.