एक्झिट पोलमध्ये आहे आकड्यांचा झोल?चर्चाना उधाण !

There is a swing in the numbers in the exit poll?

 

 

 

लोकसभेची मिनी निवडणूक म्हणून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहले जात आहे. पाचही राज्यात मतदान झाले असून ३ डिसेंबरला अंतिम निर्णय होणार आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीगड आणि मिझोराममध्ये सर्व राजकीय पक्ष आपलं नशिब आजमावणार आहे.

 

 

 

मात्र यापूर्वी सर्व राज्यामंधील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. कोणावर विश्वास ठेवावा, असा पेच सर्वसामान्य मतदारांना पडला आहे. सर्व राजकीय पक्ष त्यांची सोयीनुसार एक्झिट पोल अंदाज लावतात. अनेकवेळा निकाल एक्झिट पोलच्या विरोधात देखील असतात.

 

 

 

एक्झिट पोल देणाऱ्या संस्था प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम करत असल्याचा दावा करतात. सर्वांनी एकाच निवडणुकीतील डेटा गोळा केला आहे.

 

 

 

एक्झिट पोलच्या व्याख्येनुसार, मतदारांचे सर्वेक्षण त्या वेळी केले जाते जेव्हा ते मतदान केल्यानंतर बाहेर पडतात. म्हणजे वेळही जवळपास सारखीच आहे. पण नुकत्याच जाहीर झालेले आकडे वेगळेच ट्रेंड दाखवत आहेत.

 

 

4 सर्वेक्षणे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार स्थापनेचे संकेत देत आहेत, तर 5 सर्वेक्षणांमध्ये थोडासा कल काँग्रेसकडे आहे. यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे आहेत,

 

 

जेव्हा एक्झिट पोल डेटा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विश्वास कुणावर ठेवावा, असा प्रश्न मतदारांपुढे निर्माण झाला आहे.

 

 

एक्झिट पोल म्हणजे निकाल नाहीत हे आधी लक्षाते घेतले पाहीजे. याचा कोणत्याही पक्षावर देखील परिणाम होत नाही. मात्र खरा निकाल येईपर्यंत एक्झिट पोल चर्तेत असतात.

 

 

 

विविध मार्गांनी एक्झिट पोल मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांमुळे नवीन लोकशाही सरकार निवडण्याच्या गंभीर प्रक्रियेला आकडेवारीच्या नावाखाली करमणुकीच्या कार्यक्रमात रूपांतरित केले आहे का?, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

 

 

 

तेलंगणात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे,

 

 

तर मध्य प्रदेशात भाजपची सरकार आहे. एमएनएफचे झोरामथांगा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे के. चंद्रशेखर राव तेलंगणात सत्तेवर आहेत.

 

 

दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोल गुरुवारी समोर आले आहेत. एक्झिट पोल्समध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार असे दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक्झिट पोल्सचा दावा नाकारला आहे. इतकेच नाही तर सिंह यांनी राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा देखील केला आहे.

 

 

 

एक्झिट पोलच्या निकालांबद्दल बोलतान सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, एक्झिट पोल्सबद्दल फार काही सांगितले जाऊ शकत नाही ते वेगवेगळे आकडे दाखवत आहेत.

 

 

 

एक्झिट पोलचे निकाल खूप वेगवेगळे आहेत. आम्ही याबद्दल काहीही सांगू शकत नाही. मी तुम्हाला खात्री देतो की मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० पेक्षा जास्त जागा आणि स्पष्ट बहुमत मिळेल, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

 

 

मध्य प्रदेशातील लोकांना बदल हवा आहे, त्यासाठी काँग्रेसला मते मिळतील. राज्यातील जनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली आहे. शिवराजसिंह चौहान आणि त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता कंटाळली आहे.

 

 

यापूर्वी गुरुवारी अनेक एजन्सींनी त्यांचे एक्झिट पोल जारी केले, ज्यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले, तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय, मिझोराममध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी एमएनएफ सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

 

 

 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात गुरुवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये काहींमध्ये भाजप आणि काहीमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करताना दिसत आहेत, मात्र राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार हे चित्र ३ डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

 

 

 

तेलंगणात (३० नोव्हेंबर) मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. त्याचवेळी, मतदानानुसार, छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवू शकते आणि तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *