भाजपमध्ये बंडाळीचे संकेत, इच्छुकाचा पक्षाला इशारा
Signs of rebellion in BJP, aspirants warn the party

मुख्यमंत्र्याचे चिंरजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी असलेले कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी
शिवसेनेने चंग बांधला आहे.जर उमेदवारी नाही मिळाली तर कल्याण पूर्वमध्ये शिवसेनाशहर प्रमुखांनी बंडाचे संकेत दिले आहे.
मतदारसंघ महेश गायकवाड यांना मिळावा असा शिंदे गटाचा आग्रह आहे. त्यासाठी कल्याण पूर्व घेऊन कल्याण पश्चिम देण्याची शिंदे गटाची तयारी आहे.
भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी भाजपला इशारा दिला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ बकाल करून ठेवला आहे असा आरोप देखील महेश गायकवाड यांनी केला आहे.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या रचनेत या मतदारसंघाची निर्मिती झाली.
यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड येतात. तर, गणपत गायकवाड हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
कल्याण पूर्वेत गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड 2009 पासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009, 2014, 2019 असे तीन टर्म म्हणजेच तब्बल पंधरा वर्षे त्यांनी कल्याण पूर्वेत काम केलं आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच तिकिट मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड यांचाच पहिला दावा असल्याचं राज्याचे मंत्री आणि भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं होते
भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला.
जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली.
या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले.
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.