अमित ठाकरेंचा विजय सुकर करण्यासाठी धावाधाव

Rushing to make Amit Thackeray's victory easy

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात मोठी चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील माहीम विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचं समोर आलं होतं.

 

माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.

 

तसेच, पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत, अशा चर्चा होत्या. मात्र, उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

 

पण, आता माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. माहीममध्ये अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

 

तसेच, अमित ठाकरेंचा रस्ता सोपा होण्यासाठी विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.

 

माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

 

त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू असल्याचं दिसत आहे.

 

दोन दिवसांपूर्वी शिंदेचं निकटवर्तीय समजले जाणारे, मंत्री दीपक केसरकर एक खास निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली.

 

तर, दुसरीकडे आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, असं वक्तव्य करत सस्पेन्स आणखी वाढवला. सदा सरवणकरांना विरोध नाही पण महायुती म्हणून आपल्याच घरचा मुलगा निवडून आणू,

 

असं आशिष शेलार म्हणाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बोलताना शिंदेंचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी देखील अमित ठाकरेंच्या बाजूनं वक्तव्य केलं. त्यामुळे आता सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.

 

 

माहीमचे विद्यमान आमदार सदा सरवणकरांना यंदाही शिंदेंकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सध्या त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

माहीमधून सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे.

 

अशातच माहीम विधानसभेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं सांगितलं जात आहे. अशातच, महत्त्वाची बाब म्हणजे, सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

 

आज 28 ऑक्टोबर रोजी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकर उमेदावरी अर्ज दाखल करणार होते. मात्र, आता त्यांची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.

 

मध्यरात्री सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. माहीम मतदारसंघातून मनसे उमेदवार अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा दिला आहे.

 

मात्र, सदा सरवणकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आता माहीममधून

 

तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

महायुतीच्या काही नेत्यांनी माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे. तेव्हापासूनच मतदारसंघासह संपूर्ण राज्यात माहीममधून तीन टर्मचे आमदार असलेले

 

सदा सरवणकर माघार घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच, सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसनं लक्ष वेधलं आहे.

 

समाधान सरवणकरांच्या स्टेटसनंतर आता माहीममध्ये आता तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे. आज शिवसेना आमदार सदा सरवणकर शिवसेना शिंदेगटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

 

सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं असून उद्या म्हणजे, 29 ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे.

 

समाधान सरवणकरांनी स्टेटसमध्ये लिहिलं आहे की, “आमदार सदा सरवणकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी शाखा क्रमांक 194, सामना प्रेस प्रभादेवी इथे उपस्तिथ राहावं…”

 

29 ऑक्टोबरला सदा सरवणकर शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सामना प्रेसजवळील शाखेपासून मिरवणूक काढत सदा सरवणकर आज मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

 

सदा सरवणकरांसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शिवसेना उबाठाचे महेश सावंत याचं कडवं आवाहन असणार आहे.

 

माहीममधून तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी माघार घेणार असल्याचं बोललं जात होतं. पण, समाधान सरवणकरांच्या स्टेटसवरुन सदा सरवणकर निवडणूक अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे.

 

दरम्यान, अमित ठाकरेंच्या विरोधात महायुतीने उमेदवार न देता, अमित ठाकरेला पाठींबा देण्याची मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती.

 

मात्र, सदा सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम असून ते आज फॉर्म भरणार असल्यानं तिहेरी लढत अटळ असल्याचं बोललं जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *