शेवटच्या दिवशी CJI चंद्रचूड म्हणाले … मला माफ करा’

On the last day CJI Chandrachud said ... I am sorry'

 

 

 

भारताचे चीफ जस्टीस ऑफ इंडिया डीवाय चंद्रचूड यांचा शुक्रवारी कामाचा शेवटचा दिवस होता. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रचूड भावुक झाले.

मी जर कधी कुणाला दुखावलं असेल, तर मला माफ करा, असं चंद्रचूड म्हणाले. सुप्रीम कोर्टात झालेल्या या कार्यक्रमात वरिष्ठ वकिलांनीही चंद्रचूड यांच्याबद्दलची भावना व्यक्त केली.

 

एटॉर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांच्यासोबतच एसजी तुषार मेहता, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखे ज्येष्ठ वकीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

चंद्रचूड यांनी भाषणात बोलताना त्यांचे आई-वडील आणि कुटंबाबद्दलचे अनुभवही शेअर केले. न्यायमूर्ती म्हणून आम्ही कठीण विषय आणि प्रकरणांवर निर्णय घेतो.

आमच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतात? हेही महत्त्वाचं आहे. डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या

आणि संवेदनशील प्रकरणांचा निकाल दिला आहे, यात राम मंदिर प्रकरण आणि संपत्तीवर सरकारच्या अधिकाराबाबतच्या निकालाचाही समावेश आहे.

 

निवृत्त होण्याआधीच्या शेवटच्या भाषणात चंद्रचूड भावुक झाले. ‘काल माझ्या रजिस्ट्रारने समारोहाची वेळ काय ठेवायची? असं विचारलं. दुपारी 2 वाजता ठेवू शकतो, असं मला सांगण्यात आलं,

 

कारण काही प्रकरणं निपटवायची होती. या कोर्टात दुपारी 2 वाजता कुणी असेल का? मला स्वत:लाच स्क्रीनवर बघावं लागेल, असा विचार आला.

आम्ही इकडे तीर्थयात्री सारखं काम करतो. आमचं काम कोणत्याही प्रकरणाची दिशा ठरवणं हे असतं. या न्यायालयाला महान न्यायमूर्तींनी सजवलं आहे, त्यांनी स्वत:चा वारसा या वास्तूमध्ये ठेवला आहे’, असं चंद्रचूड म्हणाले.

डीवाय चंद्रचूड यांनी होऊ घातलेले सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गेल्यानंतरही या कोर्टामध्ये

काही बदलणार नाही, कारण जस्टीस खन्ना यांच्यासारखी स्थिर आणि प्रतिष्ठित व्यक्ती हे पद सांभाळेल’, असं वक्तव्य चंद्रचूड यांनी केलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *