थेट अपक्ष उमेदवारच उतरला शिवसेनेच्या प्रचाराला
Only an independent candidate entered Shiv Sena's campaign

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच नवीन ट्विस्ट येत आहेत. कल्याण पश्चिम मतदारसंघात तर अजबच दृष्य बघायला मिळत आहे.
कल्याण पश्चिमममध्ये भाजप बंडखोराने उमेदवारी अर्ज दाखल केला, पक्षाने कारवाई केली तरी अर्ज मागे घेतला नाही आणि आता हाच बंडखोर उमेदवार शिवसेनेच्या प्रचाराला मैदानात उतरला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याण पश्चिममधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरूण पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला आहे. वरूण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर
यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपकडून वरूण पाटील यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली होती.
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर वरूण पाटील यांनी विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला आहेत. तसंच स्वत:चा प्रचार न करता विश्वनाथ भोईर यांचा प्रचार करण्याचं स्पष्ट केलं आहे.
‘मी उमेदवारी अर्ज भरला, नंतर सगळ्यांनी सांगितल्यानंतर माघार घेण्यासाठी मी गेलो पण विलंब झाल्यामुळे फॉर्म मागे घेता आला नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
कपिल पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारापाठीशी उभं राहिलं पाहिजे, अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर करतोय.
मी प्रचाराला सुरूवात केली नव्हती. माझ्या समर्थकांनाही मी विश्वनाथ भोईर यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणा’, असं वरूण पाटील म्हणाले आहेत.