सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप;पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं

Sushma Andhagara's serious accusation against Devendra Fadnavis; once again ended the Maratha leadership

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला.

 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला.

 

यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

 

विनोद तावडे नालासोपाऱ्यात विवांत हॉटेलमध्ये त्यांचे उमेदवार राजन नाईक यांच्या भेटीसाठी आले होते. दोन्ही नेते हॉटेलमध्ये बसलेले असतानाच अचानक बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर

 

आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह विवांत हॉटेलमध्ये आले. विनोद तावडे पैसे वाटपासाठी बॅगेत 5 कोटी रुपये घेऊन आले, असा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. यावेळी क्षितीज ठाकूर यांनी पैशांचं बंडल देखील माध्यमांना दाखवले.

 

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बोलताना विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या.

 

मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. यानंतर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

 

‘भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?’ असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

 

या प्रकरणावर विनोद तावडे म्हणाले की, आज नालासोपारामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीत मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत? हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो.

 

यावेळी आमचे विरोधक हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांचा समज झाला की मी पैसे वाटत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नक्कीच चौकशी करावी.

 

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, सीसीटीव्ही चेक करावे, त्यातून सत्य बाहेर येईल. मी 40 वर्षापासून भारतीय जनता पक्षात आहेत.

 

हितेंद्र ठाकूर मला चांगले ओळखतात. सत्य सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात पैसे वाटपाचा प्रकार मोदी- शाह यांच्या आशीर्वादानेच सुरु असल्याचा आरोप

 

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. विधानसभेतील पराभवाचे खापर फोडण्यासाठी भाजपच्याच मोठ्या नेत्याने विनोद तावडेंबाबत माहिती दिल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला फोन करुन शुभेच्छा दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

राज्यभर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून वारेमाप पैसा वापरला जात आहे. कराड दक्षिणेत दोन दिवसापूर्वी पैसै वाटताना एकाला पकडले आहे. सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मोदी – शाहा यांच्या आशीर्वादने हा प्रकार सुरु असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

 

निवडणुकीनंतर भाजपाचा पराभव झाल्यास विनोद तावडेंवर पराभवाचे खापर फोडले जाईल आणि चुकून भाजपाचा विजय झाला तर विनोद तावडेंना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न चालला असून भाजपाचा अंतर्गत प्रश्न

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता.

 

विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

 

हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणावरुन विरोधकांकडून विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

मनोज जरांगेनी मला शुभेच्छा दिल्या असून मला श्रेयवादात, राजकारणात पडायचे नाही. आज दुपारी 3.30 वाजता मनोज जरांगे यांचा फोन आला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे.

 

सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत.

 

या विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्यांना निवडणूक लढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

 

तर, दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे अतुल भोसले हे निवडणूक लढवत आहेत. अत्यंत चुरशीची ही लढत होण्याची शक्ययता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *