मंत्रिमंडळ शपथविधीसाठी राजभवनावर हालचालींना वेग ,एकनाथ शिंदें उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही

Movement accelerates at Raj Bhavan for cabinet swearing-in ceremony, Eknath Shinde not interested in Deputy Chief Minister's post

 

 

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी सीएमपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे.

 

मात्र त्याग करणाऱ्या शिंदेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्यामुळे शिंदेंची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

तशी ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जातं. मात्र मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर ‘उप’ जबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला संधी देण्याचं शिंदेंच्या मनात आहे.

 

त्याचप्रमाणे फडणवीस २.० मंत्रिमंडळात सहभागी होऊन हेविवेट खाते पदरात पाडून घेण्यासाचाही त्यांचा मानस असल्याचे बोलले जाते.

 

कोणाकोणाचा पत्ता कट होण्याची शक्यता?
दरम्यान, दोन डिसेंबर रोजी महायुती मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. परंतु संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्रिपदासोबत गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील,

 

विजयकुमार गावित यांच्यासारख्या बड्या नेत्यांबाबत सध्या वेट अँड वॉच सुरु आहे. दिग्गजांऐवजी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

भाजपमधून कोणाला संधी मिळू शकते?
आशिष शेलार – मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना मंत्रिपद देऊन मुंबईत त्यांचे हात बळकट केले जाण्याची शक्यता.

रविंद्र चव्हाण – ठाणे आणि कोकणाात विधानसभा निवडणुकीत १०० टक्के स्ट्राईक रेट राखल्याची बक्षिसी शक्य
पंकजा मुंडे – गोपीनाथ मुंडे यांचा वारसा, ओबीसी चेहरा, महिला नेतृत्व, मराठवाड्यात मिळालेले यश या पॉझिटिव्ह बाबी

 

नितेश राणे – भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा, कोकणातील प्रमुख नेता
गोपीचंद पडळकर – भाजपमधील धनगर चेहरा, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, आक्रमक नेतृत्व

 

राजभवनावर हालचालींना वेग आला आहे. लवकरच नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होऊन मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

भाजपच्या नेतृत्वातील महायुती शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा करेल. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

मुळात कोणत्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळणार, याबाबतही अजून संदिग्धता आहे. पाच वर्ष एकाच पक्षाकडे किंवा एकाच नेत्याकडे राहणार की वाटले जाणार, याचा फॉर्म्युलाही ठरलेला नाही.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित मानलं जात असलं, तरी त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु मंत्रिमंडळाचे संभाव्य विभाजन समोर आले आहे.

 

यानुसार, मुख्यमंत्र्यांशिवाय २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपच्या सर्वात जास्त आमदारांचा समावेश असेल. भाजपचे १० जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. या कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा दोघांचाही समावेश असेल.

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून ६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची चिन्हं आहेत. यामध्ये चार कॅबिनेट मंत्री, तर दोन राज्यमंत्रिपदांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ मंत्रिपदं येऊ शकतात. त्यात ३ कॅबिनेट मंत्री, तर एक राज्यमंत्री असण्याचे संकेत मिळत आहेत.

 

दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा कधी होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत हा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत. मंत्रिमंडळात नेमकी कुणाकुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *