थंडीने हुडहुडी भरणार,महाराष्ट्र गारठणार? पाहा हवामानाचा अंदाज?

Will Maharashtra be gripped by cold? Check the weather forecast.

 

 

 

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील हवमान तर सर्वांत लहरी मानलं जातं. नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या दिवशी असं निदर्शनास आलं की, 2024मधील नोव्हेंबर महिना हा गेल्या पाच वर्षांतील नोव्हेंबर महिन्यांपेक्षा सर्वांत उष्ण होता.

 

या वर्षी या महिन्यातील दिवस आणि रात्रीचं तापमान सर्वाधिक होतं. ‘झी न्यूज’ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

 

दिल्ली-एनसीआरमधील हवामानाबद्दल आयएमडीने सांगितलं की, शनिवारी (30 नोव्हेंबर) विरळ धुक्यासह कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 26 अंश सेल्सिअस आणि 10 अंश सेल्सिअस असेल.

 

आकडेवारीनुसार, 2019 नंतर पहिल्यांदाच तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्यासाठी इतका वेळ लागला. 2019 मध्ये 1 डिसेंबर रोजी तापमान 10 अंशांच्या खाली गेलं होतं.

 

25 नोव्हेंबर रोजी किमान तापमानात मोठी घसरण सुरू झाली. या दिवशी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. वायव्येकडून येणारे थंड वारे आणि निरभ्र आकाशामुळे त्यात सातत्याने घसरण झाली.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबरला किमान तापमान 11.9 अंश सेल्सिअस, 27 नोव्हेंबरला 10.4 अंश सेल्सिअस आणि 28 नोव्हेंबरला 10.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं होतं.

 

तर शुक्रवारी या हिवाळ्यात प्रथमच तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं. आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीबद्दल सांगितलं की,

 

नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानातील घट सामान्य आहे. पण, पाऊस आणि हिमवर्षाव नसल्यामुळे या वर्षीचा हिवाळा सामान्यपेक्षा उबदार आहे.

 

या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील सरासरी किमान तापमान 14.9 अंश सेल्सिअस होतं. हे तापमान 13 अंश सेल्सिअसच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LPA) सुमारे दोन अंश सेल्सिअस जास्त आहे.

 

तर या वर्षीच्या नोव्हेंबरमधील सरासरी कमाल तापमान 29.5 अंश सेल्सिअस होतं ते एलपीएपेक्षा 1.1 अंश सेल्सिअसने जास्त आहे.

 

काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आज एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करू शकतो.

 

त्यामुळे हवामानात बदल दिसून येईल. हा बदल पुढील 96 तास टिकेल. विशेषत: जास्त उंचीच्या भागांत अधिक बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश

 

आणि उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी होऊ शकते. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांतील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

 

 

ऑक्टोबरमध्येही सामान्यपेक्षा जास्त उष्णता होती. या वर्षीचा ऑक्टोबर महिना 1951 नंतर दिल्लीतील सर्वांत उष्ण ऑक्टोबर होता. दिवसा

 

आणि रात्रीचं सरासरी तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्त नोंदवलं गेलं होतं. ऑक्टोबरमध्ये सरासरी मासिक कमाल तापमान अनुक्रमे 35.1 आणि 21.2 अंश सेल्सिअस होतं. किमान तापमान अनुक्रमे 36.2 आणि 22.3 अंश सेल्सिअस होतं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *