शपथविधीपूर्वी महायुतीची एकनाथ शिंदे सोबतची बैठक रद्द

Mahayuti's meeting with Eknath Shinde before the oath-taking ceremony cancelled

 

 

 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही.

 

यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यात महायुतीला बहुमत मि‌ळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून

 

शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आरास करण्यासाठी शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. याबाबतची माहीती खुद्द शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली होती.

 

‘विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दररोज ८ ते १० सभा करत असल्याने प्रचंड धावपळ झाली होती. यातून थोडासा आराम करण्यासाठी दरे मुक्कामी आलो असून आपली प्रकृती थोडी खराब होती.

 

मात्र आता आपली प्रकृती ठीक आहे’ असे त्यांनी सांगितले होते. दरे गावात विश्रांती घेतल्यानंतर रविवारी ते ठाण्यातील निवासस्थानी परतले. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रीय होतील,

 

अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सोमवारीही त्यांची प्रकृती ठिक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून घरीच विश्रांती घेतली.

 

दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?,

 

एकनाथ शिंदेंनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारी नेते सागर बंगल्यावर पोहोचत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आजही सागर बंगल्यावर नेते पोहोचले आहेत.

 

चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन तसंच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झाले आहेत. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांची नावं मंत्रिपदासंदर्भात चर्चेत आहेत.

 

अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल,

 

तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?,

 

महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?,

 

संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *