इंडिया आघाडीच्या बैठकीची तारीख ठरली

The date of the meeting of the India Alliance has been decided ​

 

 

 

 

नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या. या निवडणूकीत कॉंग्रेसला फक्त एका राज्यात सत्ता मिळवता आली. कॉंग्रेसच्या पराभवामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीतही सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून आले.

 

 

इंडिया आघाडीची ६ डिसेंबरला ठरलेली बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर आता अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

 

 

इंडिया आघाडीची ६ डिसेंबरला ठरलेली बैठक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. मात्र ही बैठक याच महिन्यात होईल, असे इंडिया आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत होते.

 

 

अखेर इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे.

 

 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांमधील पराभवावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकांची रणनितीही ठरवली जाऊ शकते. सोबतच किमान समान कार्यक्रम आणि लोकसभेच्या जागावाटपाबाबत देखीलबैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

 

कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स अकाउंटवर ट्वीट करत या बैठकीची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मंगळवारी १९ डिसेंबर २०२३ ला दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. जुडेगा भारत, जितेंगा इंडिया! असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हणले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *