मंत्रिमंडळात शपथ घेतलेले शिवसेना शिंदे गटाचे 11 मंत्री

11 ministers from Shiv Sena Shinde faction sworn in to the cabinet

 

 

 

आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांनी आज नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता.

 

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिदे गटाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली.

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

 

विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून जेव्हा उठाव केला तेव्हा त्यांच्यासोबत दीपक केसरकर देखील होते.

 

दीपक केसरकर यांनी या उठावानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू ठामपणे मांडली, उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर त्यांनी घणाघाती टीका केली.

 

त्यांना उठावानंतर स्थापन झाललेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं, मात्र आता नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाला आहे. दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच तानाजी सावंत यांना देखील यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाहीये.

 

गुलाबराव पाटील – शिवसेना दादा भुसे – संजय राठोड – उदय सामंत शंभूराज देसाई संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले प्रकाश आबिटकर आशीष जैस्वाल – राज्यमंत्री योगेश कदम – राज्यमंत्री

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *