शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल ;बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू

Preliminary autopsy report: Somnath Suryavanshi died due to brutal beating

 

 

१० डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली.

 

त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक जाळपोळच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले.

 

ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली आहे.

 

त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन न्यायालयाच्या निगराणीत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात आलं आहे.

 

संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये झालेल्या आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या अहलावात एक धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे.

 

ती म्हणजे बेदम मारहाणीमुळे सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. घाटी रुग्णालयाचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे.

 

दरम्यान, प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस अधिकृत ट्विटर हँडलवर देखील त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. ”सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच! शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण उघड.

परभणी येथे आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे. संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले.

 

यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता.

 

त्यांचा रविवारी (दि.15) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले आहेत.

 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली होती. तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

 

Image

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *