आज होणार मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर ?

Will the portfolio allocation of ministers be announced today?

 

 

 

राज्यात आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडा लोटला आहे. हिवाळी अधिवेशनही संपत आले असून खातेवाटप कुठं रखडलंय असा प्रश्न सर्वांना पडलाय.

 

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याचं समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेआठ वाजता जाणार आहेत.

 

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याची एकच चर्चा असताना

 

ऐन अधिवेशनात खातेवाटप झाल्यासही आणखी नाराजी वाढू शकते, त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेत असल्याचं बोललं जात आहे.

 

अधिवेशन संपल्यावर 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला मुख्यमंत्री, खातेवाटपाचं पत्र राजभवनला पाठवतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील,

 

असं सांगण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही, असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जात आहे.

 

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन परंपरेने विदर्भात पार पडते. मात्र, विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचे अपेक्षित असलेले हिवाळी अधिवेशन आता फक्त एक आठवड्यात पुरते मर्यादित झाले आहे.

 

त्यामुळे विदर्भातील आमदारांमध्ये नाराजी आणि निराशेची भावना आहे. गेले अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होत दोन ते तीन आठवड्यापर्यंत मर्यादित होता.

 

यंदा मात्र नुकतेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवडाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनात अपेक्षित वाव मिळू शकलेलं नसल्याचं मत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

 

विदर्भातील मुख्यमंत्री असताना पुढच्या वेळी हिवाळी अधिवेशन जास्त कालावधीचा होईल अशी अपेक्षा ही आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे..

 

यंदा प्रश्नोत्तरांचा तास तसेच लक्षवेधी सूचनाची संधी नसल्यामुळे अनेक आमदारांना खास करून नवीन आमदारांना या अधिवेशनात बोलण्याची संधीही मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली

 

यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

 

तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.

 

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोललं जात आहे. पुढच्या काही तासात महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील. या चर्चेनंतर खातेवाटपाबद्दल घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे.

 

महायुती सरकारमध्ये खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत.

 

तर शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी माहिती समोर येत आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत तिढा निर्माण झालेले गृहखातं अखेर भाजपला मिळणार असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि

 

भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाली आहे. तसेच शिवसेनेकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *