नाराज छगन भुजबळांचा एल्गार ;पण पक्ष दखलच घेईना ,आता नजरा निर्णयाकडे

Angry Chhagan Bhujbal's Elgar; But the party will not take any notice, now look at the decision

 

 

 

राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मुंबईकडे कूच केले. मुंबईत ते समर्थकांशी चर्चा करणार असून, त्यानंतर कोणता निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

भुजबळ यांच्या नाराजीची पक्षाने चार दिवसांनंतरही दखल न घेतल्याने भुजबळ समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे. त्यातच शुक्रवारी नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळांशी ‘गुफ्तगू’ केले

 

आणि त्यानंतर भुजबळ मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे हेविवेट नेते असतानाही मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज झाले आहेत.

 

भुजबळांना मंत्री न केल्यामुळे भुजबळ समर्थक आक्रमक झाले असून, त्यांनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने भुजबळ थेट नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झाले होते. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर भुजबळांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल

 

आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरच हल्लाबोल केला होता. बुधवारी (दि. १८) राज्यातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी देशभरात ओबीसी एल्गार उभा करण्याचा नारा दिला.

 

राष्ट्रवादी सोडण्याबाबत घाईघाईने निर्णय घेणार नसल्याचे सांगत मुंबईत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले होते.

 

त्यानंतर गुरुवारी मात्र भुजबळांनी शांततेचे धोरण स्वीकारले होते. आता भुजबळ मुंबईकडे रवाना झाल्याने त्यांच्या मुंबईभेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर कांदेंनी पुन्हा भुजबळांवर तोफ डागत अजितदादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिल्याचा दावा केला.

 

भुजबळांचे जेव्हा वाईट होते तेव्हा मी खुश असतो. भुजबळांनी केलेल्या कृत्याचे फळ त्यांना मिळाले असून, त्यामुळे आपण आनंदित असल्याचा दावा कांदेंनी केला.

 

लोकसभा आणि विधानसभेत भुजबळांनी आमच्याविरोधात काम केले असून, त्याचेच फळ मिळाले आहे. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाशिकमध्ये छान चालले असल्याचा दावाही कांदेंनी केला आहे.

 

भुजबळांमध्ये पक्ष सोडण्याची हिंमत नाही. माझे भुजबळांना पुन्हा आव्हान आहे, त्यांनी वेगळे होऊन दाखवावे, असेही कांदे म्हणाले.

 

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शुक्रवारी सकाळी अचानक भुजबळ यांची भुजबळ फार्मवर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ ‘गुफ्तगू’ झाल्यानंतर भुजबळ माध्यमांशी न बोलताच मुंबईकडे रवाना झाले.

 

त्यामुळे भुजबळ आता पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. चार दिवसांत पक्षाकडून, तसेच अजित पवारांकडन त्यांची दखल घेतली गेलेली नाही.

 

त्यामुळे भुजबळ आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार, की वेगळा पर्याय निवडणार हे आगामी दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

भुजबळविरोधी गटाला शांततेचा संदेश छगन भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारल्यानंतरही राष्ट्रवादीच्या एका गटाने चुप्पी साधली होती.

 

राष्ट्रवादीतल्या भुजबळविरोधी गटाने भुजबळ समर्थकांना उत्तर देण्याची तयारी चालवली होती. त्यासाठी शुक्रवारी काही पदाधिकाऱ्यांनी भुजबळांविरोधात पत्रकार परिषद घेण्याची तयारीही चालवली होती.

 

परंतु, प्रदेश स्तरावरील या नेत्यांना वरिष्ठांकडून शांततेचा संदेश देण्यात आला. भुजबळांविरोधात कोणीही बोलू नये, अशा सूचना करण्यात आल्यानंतर या स्थानिक नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्याची माहिती सूत्रांनी दिली

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *