राज्यात येत्या ४८ तासांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता

Cold wave likely to intensify in the state in the next 48 hours

 

 

 

राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आली असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. तापमानात थोडी वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे.

 

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गारठा वाढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे.

 

त्यामुळे मध्य भारतापर्यंत गारठा वाढला आहे. तर पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानात घट होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशात २३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

त्याचबरोबर पश्चिम राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यात २५ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी अहिल्यानगरचे तापमान सर्वात कमी होते.

 

या ठिकाणी ७.५ डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात परभणी, निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही थंडी वाढली आहे. विदर्भासुद्धा थंडीचा कडाका वाढला आहे.

 

बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.तसेच, पश्चिमी विक्षोभामुळे थंडीची स्थिती वाढू शकते. अनेक भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

तसेच पुढील काही दिवस डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या ४८ तासांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळू हळू थंडी कमी होणार आहे.

 

महाराष्ट्रात कोकण व रत्नागिरीतील तापमानात वाढ झाली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. नैऋत्य व लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आज कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

 

तर पुढील १२ तासांत ते उत्तर तामिळनाडू ते आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर २४ तासांत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

 

त्यामुळे विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात महाराष्ट्रात चारही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *