मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, पाहा कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला

Allotment of bungalows to ministers, see which ministers got which bungalow

 

 

 

महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

 

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे.

 

तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड देण्यात आला आहे.

 

मंत्री गिरीश महाजन यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेतवन बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री गणेश नाईक यांना ब-४ पावनगड हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांना ब-३ जंजीरा बंगला देण्यात आला आहे. मंत्री संजय राठोड यांना शिवनेरी बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला देण्यात आला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना ब-५ विजयदुर्ग बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री उदय सामंत यांना मुक्तागिरी बंगला देण्यात आला आहे. मंत्री जयकुमार रावल यांना चित्रकुट बंगला देण्यात आला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री अतुल सावे यांना अ-३ शिवगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री अशोक उईके यांना अ-९ लोहगड देण्यात आला आहे. मंत्री शंभूराज देसाई यांना मेघदुत बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री आशिष शेलार यांना रत्नसिंधू बंगला देण्यात आला आहे. मंत्री आदिती तटकरे यांना प्रतापगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड देण्यात आला आहे.

 

मंत्री माणिकराव कोकाटे यांना अंबर बंगला देण्यात आला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांना प्रचितीगड हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांना सुरुचि-०९ बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री संजय सावकारे यांना अंबर-३२ हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री संजय शिरसाट यांना अंबर-३८ बंगला देण्यात आला आहे.

 

मंत्री प्रताप सरनाईक यांना अवंती-५ हा बंगला देण्यात आला आहे. मंत्री भरत गोगावले यांना सुरुचि-०२ हा बंगला देण्यात आला आहे. तर मंत्री मकरंद पाटील यांना सुरुचि-०३ हा बंगला देण्यात आला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *