रशियाहुन येणारे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले ;पाहा LIVE VIDEO
Plane coming from Russia crashes in Kazakhstan; watch LIVE VIDEO
कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमानाला अपघात झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान क्रॅश झाल्यानंतर स्फोट झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
विमानातील तांत्रिक बिघाडानंतर वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, पुढे काय झालं हे अद्याप कळू शकलं नाही. दरम्यान, विमान क्रॅश झाल्याने मोठी जिवीतहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून
ख्रिसमसच्या सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचं हे विमान असून या विमानातून 67 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी, 25 प्रवाशांना वाचविण्यात यश आलं असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कझाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालायने याबाबत माहिती देताना सांगितले की, विमान दुर्घटनेच्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी
अग्निशमन दलाची पोहोचली आहे. सध्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असून प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत काही जण सुदैवाने बचावले आहेत.
रशियन न्यूज एजन्सीनुसार, अजरबैजान एयरलाईन्सच्या ह्या विमानाने रशियाच्या चेचन्या येथील बाकूमधून ग्रोज्नीसाठी उड्डाण भरले होते. ग्रोज्नीमध्ये धुके पडल्याने या विमानाने प्रवासी मार्ग बदलला होता.
दरम्यान, अद्याप अजरबैजान एयरलाइंसने या दुर्घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, दुर्घटनेत किती प्रवासांचा मृत्यू झाला याबाबतही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, घटनास्थळी आपत्ती विभाग बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विमानात 67 प्रवासी प्रवास करत होते. कझाकिस्तानच्या आपत्ती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विमानातील 25 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.
त्यातील 22 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याबाबतचा तपास केला जात आहे.
Reports are coming in of an accident at Aktau Airport, Kazakhstan involving an Azerbaijan Airlines Embraer ERJ-190. pic.twitter.com/X42mS3sSsO
— Aviation Safety Network (ASN) (@AviationSafety) December 25, 2024