जरांगे पाटलांना ,वाल्मिक कराडच्या पत्नीने खडसावले ,म्हणाल्या …..
Valmik Karad's wife scolded Jarange Patil, saying...
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय तापलं आहे. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
त्याआधी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं.
कराडच्या पत्नी पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी पती वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडला अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
सोबतच, यावेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती देखील हल्लाबोल केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्नी मंजली वाल्मिक कराड म्हणाल्या मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिध्द करा, यांना जातीवाद करायला कोणी शिकवला,
जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जातोय, आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजली वाल्मिक कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर काल वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर, समर्थकांनी आणि कुटूंबीयानी ठिय्या आंदोलन केले. त्यात वाल्मिक कराडची 75 वर्षीय आई आणि पत्नीही सहभागी झाली होती.
यावेळी माध्यमाशी बोलताना वाल्मिकची पत्नी मंजली वाल्मिक कराडने जातीवाद आणि राजकारणापायी माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जातोय. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा दिला आहे.
परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड याच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे.
काल वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते, तरीही परळी शहरातील निम्मी बाजारपेठ आताही बंद असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यानंतर वाल्मिक कराडने ) पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. वाल्मिक बाबुराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे.
काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयवरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे, ज्याची आजच्या बाजार भावानुसार हा फ्लॅट साडे तीन कोटींच्या किमत आहे.
सध्या इथं कोणी राहत नसल्याची माहिती आहे, मात्र मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिटकवली आहे.
दरम्यान आज वाल्मिक कराड याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून एसआयटी तर्फे तपास अधिकारी अनिल गुजर या संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला.
दरम्यान या प्रकरणी आता मोठी बातमी समोर आली असून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या 9 डिसेंबर रोजी झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले.
या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती.
या मागणीला आता बीड कोर्ट मान्यता देते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा
मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला आहे. परिणामी प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीच्या या मागणीला बीड कोर्टाने मान्यता देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात पुढे आलेल्या माहितीनुसार विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे. यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये काही परस्पर संबंध काय आहेत?
याची माहिती घेण्यात आलीय. तसेच फरार आरोपी अजून सापडायचा आहे त्या कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहितीही SIT ला घ्यायची आहे.
सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे गेले अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहितीही SIT ला घ्यायची आहे. परिणामी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशी संदर्भात बीड न्यायालयाकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केले जाण्याचे संकेत आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले,
अशी एसआयटीने बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान माहिती दिली. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे.
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि य तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीकडून करण्यात आली