वाल्मिक कराडचे अमेरिका कनेक्शन ; 3 फोनमधून खळबळजनक खुलासा

Valmik Karad's American connection; Sensational revelations from 3 phones

 

 

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येतायत. दोन दिवसांपूर्वी सीआयडीनं वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

या कारवाईनंतर वाल्मीक कराडसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या सुटकेचे मार्ग बंद होताना दिसत आहेत. अशात आता वाल्मीक कराडचं अमेरिका कनेक्शन देखील समोर आलं आहे.

 

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाल्मीक कराडचे तीन मोबाईल जप्त केले होते. यातून आता खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

 

खरं तर, वाल्मीक कराडने संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.

 

याबाबतची कबुली स्वत: विष्णू चाटे यानं दिली होती. पोलिसांनी चाटे याचा फोन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना अद्याप चाटे याच्या फोनचा सुगावा लागला नाही.

 

दरम्यान पोलिसांनी तपासासाठी वाल्मीक कराडचे दोन फोन जप्त केले होते. या फोनमधून खळबळजनक खुलासा झाला आहे.

पोलिसांनी वाल्मीक कराडचे जे तीन मोबाईल जप्त केले होते. त्यातील काही सीमकार्ड अमेरिकेत रजिस्टर करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच मोबाइलवरून काही लोकांना फोन केल्याचा संशय एसआयटीला आहे. आता वाल्मीकने हे फोन कुणाला केले? कशासाठी केले? याची माहिती अद्याप समोर आली नाही.

 

मात्र त्याचे सीमकार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याने या प्रकरणात नवा ट्वीस्ट आल्याचं बघायला मिळत आहे. सध्या एसआयटीकडून वाल्मीकच्या अमेरिका कनेक्शनचा तपास केला जात आहे.

दुसरीकडे, वाल्मीक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर परळीत अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढण्यात आले आहेत.

 

परळीतील एका तरुणाने तर चक्क पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मीक कराडच्या सुटकेसाठी आंदोलन केलं. वाल्मीक कराडच्या आई आणि पत्नीही आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्या आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे परळीतील राजकीय वातावरण तापलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *