करुणा शर्मा यांनी सांगितला धनंजय मुंडेंसोबत 1998 मध्ये लग्न आणि आजपर्यंतचा जीवनप्रवास
Karuna Sharma talks about her marriage to Dhananjay Munde in 1998 and her life journey till date

अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत करुणा शर्मा यांनी अनेक दावे केले आहेत. आपली धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट कधी झाली, लग्न कधी झालं ते भांडण कधीपासून सुरु झालं, याबाबत करुणा शर्मा यांनी अनेक दावे केले आहेत.
दरम्यान, वांद्रे कोर्टाने नेमकं कोणत्या प्रकरणाचा आज निकाल दिला, याबाबतही करुणा शर्मा यांनी खुलासा केला. “कौटुंबिक छळ हे प्रकरण आता पुढे चालणार आहे.
आता फक्त पोटगीचा निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाकडून मला धनंजय मुंडे यांची बायको म्हणून पोटगी मिळाली पाहिजे हे मान्य झालं आहे.
पण पुढे कौटुंबिक हिस्साचाराचा जो भाग आहे, ज्यामध्ये माझ्या बहिणीवर अत्याचार झाला, माझ्या आईसोबत अन्याय झाला, मला जेलमध्ये टाकलं,
हे सर्व पुढचे विषय आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 20 तारीख दिलेली आहे. या प्रकरणाची केस पुढे सुरु राहणार आहे”, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.
“आमच्यात 2021 पासून भांडण सुरु आहे. त्याआधी आमच्यात सर्व चांगलं सुरु होतं. आमचं 1998 मध्ये लग्न झालं होतं. त्याआधी 1996 ला आमची भेट झाली होती.
आम्ही 26 वर्षे एकत्र होतो. ते मला खूप चांगल्याप्रकारे ठेवायचे. त्यांच्या खूप गोष्टी समोर आल्या. पण माझ्याशी खूप चांगल्याप्रकारे राहायचे”, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
“मला कोणतीच अडचणी नव्हती. पण काही गोष्टी होत्या, 2008 मध्ये माझ्या बहिणीचा मुद्दा आला, त्यानंतर माझ्या आईसोबत काही घटना घडली.
मी 2008 मध्ये विषय घेतलं होतं. त्यावेळी एक वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी होती, त्यांची जबाबदारी असल्याने एक असहाय्य महिला काय लढणार हा विचार करुन मी शांत होते”, असा दावा करुणा शर्मा यांनी केला.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याला मारहाण झाल्यादा दावा करुणा शर्मा यांनी केला. “मी बीडमध्ये असते. मी लोकांचे काम घेऊन नेहमी जिल्हाधिकाऱ्यांकडे जात असते.
तेव्हा मी तिथे मंत्री धनंजय मुंडे यांना बघितलं. तिथे डीपीडीसीची बैठक तिथे सुरु होती. तिथे वाल्मिक कराड आला आणि म्हणाला, तू अंदर चल. मला त्याने आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली.
तसेच मला खूप मारहाण केली. तुम्ही सीसीटीव्ही फुटेजही पाहिले तर माझ्यासोबत किती अन्याय झाला आहे ते तुम्हाला कळेल”, असा दावा करुणा शर्मा यांनी केला.
“आमच्यावर पोलिसांचा खूप मोठा दबाव होता. कधीही 30 ते 40 पोलीस यायचे, मला कधीही उचलून घेऊन जायचे. तुम्ही सीसीटीव्हीतही बघू शकता. मला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवायची.
कधी अंधेरी बोलवायचे तर कधी वांद्रेला बोलवायची. एकदा तर माझे पती लीलावती रुग्णालयात दाखल होते. मी त्यांना पाहण्यासाठी गेली तर मला पोलीस उचलून घेऊन गेली.
मला रात्री 11 वाजता सोडलं. 30 पोलिसांनी येऊन माझ्या घराची झडती घेतली. माझ्या घरातील सर्व सामान आस्थाव्यस्थ केलं. मी काय केलं होतं? पतीला पाहणं गुन्हा आहे का?”, असा सवाल करुणा शर्मा यांनी केला.
“मुलंही खूप घाबरलेले आहेत. आम्हाला सुद्धा माहिती नाही की, आम्ही कधी आत्महत्या करु. आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही काय करु, आम्हाला काहीच माहिती नाही. इतकं प्रेशर माझ्या डोक्यावर आहे”, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनंजय मुंडे यांना पूर्ण पाठिंबा आहे हे मी पाहिलं आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हापासून पाहिलं आहे. त्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तर पाठिंबा आहेच”, असादेखील दावा करुणा शर्मा यांनी केला.