ट्रम्पचा मोठा निर्णय ;चार भारतीय कंपन्यांवर घातले निर्बंध

Trump's big decision; sanctions imposed on four Indian companies

 

 

 

अमेरिकेकडून इराणव गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. याच निर्बंधांचा एक भाग म्हणून इराणमधून निर्यात होणार्‍या तेलाची वाहतूक करणाऱ्या संलग्न कंपन्यांनाही आता ट्रम्प प्रशासनानं लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

 

प्रामुख्याने यात इराणमधून निर्यात होणारं कच्चं तेल आणि पेट्रोलियमची उत्पादनं यांचा समावेश आहे. अशी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची यादीच अमेरिकेनं तयार केली असून त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यात भारतातील चार कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एक कंपनी नवी मुंबईतील आहे.

 

 

भारतातील निर्बंध लादण्यात आलेल्या चार कंपन्यांचा इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करण्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

इराणवर ‘सर्वाधिक निर्बंध मोहीमे’अंतर्गत ही पावलं ट्रम्प प्रशासनाकडून उचलण्यात येत आहेत. निर्बंधांच्या यादीत एकूण ३० व्यक्ती वा तेलवाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे. ही जहाजं वेगवेगळ्या देशांमधली आहेत.

 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध घातलेल्या कंपन्यामध्ये ४ भारतीय कंपन्या आहेत. त्यात नवी मुंबईतील फ्लक्स मेरिटाईम एलएलपी (Flux Maritime LLP), दिल्ली एनसीआरमधील बीएसएम मरीन एलएलपी (BSM Marine LLP)

 

व ऑस्टिनशिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (Austinship Management Pvt Ltd) तर तंजावरमधील कॉसमॉस लाईन्स इंक (Cosmom Lines Inc.) या कंपन्यांचा समावेश आहे.

 

यापैकी तीन कंपन्या या इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या व्यावसायिक वा तांत्रिक व्यवस्थापक असल्याच्या आरोप आहे, तर कॉसमॉस लाईन्स या कंपनीवर इराणच्या पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

“आज निर्बंध लादण्यात आलेल्या कंपन्यामध्ये यूएई व हाँगकाँगमधील तेलाच्या दलाल कंपन्या, भारत व चीन मधील टँकर मॅनेजर कंपन्या, इराणच्या नॅशनल इरानियन ऑईल कंपनीचे प्रमुख यांचा समावेश आहे.

 

याशिवाय इराणच्या लाखो बॅरल तेलाची वाहतूक करणाऱ्या काही जहाज कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत”, अशी माहिती अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल अर्थात OFAC कडून देण्यात आली आहे.

 

भारतीय कंपन्यांवर अमेरिकन प्रशासनाकडून अशा प्रकारे निर्बंध लादले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. उदाहरणार्थ, ऑक्टोबरमध्ये भारतातील गब्बारो शिप सर्व्हिसेस या कंपनीवर बंधनं लादण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत आणखी तीन कंपन्यांवर निर्बंध लादण्यात आले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *