भारतावर डोनाल्ड ट्रम्प संतापले, चक्क घेतली शपथ
Donald Trump got angry with India, took an oath

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा दिवसांपूर्वी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत काढून टेरिफ वॉर थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
परंतु डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत काढण्यात मोदी यांनी अपयश आल्याचे दिसून येत आहे. टेरिफ वॉर कमी करण्यात नरेंद्र मोदी यांना यश आले नाही. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरचे भारत लक्ष ठरत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट भारताचे नाव घेत शपथ घेतली आहे. लवकरच भारतावर रेसीप्रोकल टेरिफ लावणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत आणि चीन हे दोन्ही देश ज्या पद्धतीने टेरिफ लावत आहे, तसेच टेरिफ त्यांच्यावर लावण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी भारताला टेरिफ किंग म्हटले आहे.
जागतिक मंचावर ट्रम्प यांनी भारताकडून लावण्यात येणाऱ्या टेरिफवर टीका केली आहे. त्यांच्या निवडणूक मोहिमेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच टेरिफच्या विषयावर भारताला कोणत्याही पद्धतीची सवलत देण्यास ट्रम्प तयार नसल्याचे दिसून येत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या टेरिफ धोरणावर अनेकदा टीका केली होती. त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे की भारतात सर्वात जास्त शुल्क आकारले जाते.
यामुळेच भारताला टॅरिफ किंग म्हटले पाहिजे. इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत ते म्हणाले की, एलोन मस्क यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. पण भारतात काम करण्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे तेथील टेरिफ आहे. त्यामुळे भारतात व्यवसाय करणे खूप कठीण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसनचे उदाहरण दिले. त्यांना भारतात प्रचंड शुल्काचा सामना करावा लागला. ते म्हणाले की, अमेरिकन कंपन्यांना परदेशी भूमीवर उत्पादन युनिट्स उभारण्यास भाग पाडले जात आहे.
जास्त टेरिफमुळे हार्ले डेव्हिडसन भारतात आपली बाइक विकू शकले नाही. त्यामुळे कंपनीला तेथे उत्पादन युनिट उभारावे लागले.
या प्रस्तावावरील मतदानात 65 देश सहभागी झाले नाहीत. यात अमेरिका, इस्रायल आणि हंगेरी या देशांनी प्रस्तावाविरोधात मतदान केलं. हा प्रस्ताव 93 मतांनी मंजूर झाला.
सुरक्षा परिषदेतील पाच युरोपियन सदस्यांच्या समर्थनाशिवाय हा प्रस्ताव मंजूर झाला. अमेरिका आणि रशियाची सर्वांनाच चक्रावून सोडणारी आघाडी समोर आली आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मागच्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनी राष्ट्रप्रमुख जेलेंस्करी यांच्यावरील शाब्दीक हल्ले वाढवले आहेत.
अमेरिकेडून UN मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला. यात रशियाचा उल्लेख नव्हता किंवा क्रेमलिनलाही आक्रमक म्हटलं नव्हतं. युक्रेनची क्षेत्रीय अखंडता सुद्धा स्वीकारली नव्हती. युद्ध लवकर संपवून युक्रेन आणि रशियामध्ये स्थायी शांततेसाठी अमेरिकेने अपील केलं आहे.
अमेरिकेच्या डिप्लोमॅट डोरोथी कॅमिली शिया म्हणाल्या की, “असे प्रस्ताव युद्ध रोखण्यात अपयशी ठरले आहेत. युद्ध खूप वाढत गेलं. युक्रेन आणि रशियासह दुसऱ्या जागांवर सुद्धा लोकांना याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे”
तीन वर्षांपासून रशियाचा हल्ला सुरु आहे. याचा विनाशकारी प्रभाव फक्त युक्रेनच नाही जगाच्या स्थिरतेसाठी धोकादायक आहे. लाखो लोक या युद्धात मारले गेले आहेत. फक्त एकादेशावर या युद्धाचा परिणाम झालेला नाही.
सगळ्या जगावर याचा परिणाम दिसून आलाय. यात दोन्ही देशात झालेल्या जिवीत आणि वित्तहानीवर शोक व्यक्त करण्यात आलाय.
युक्रेनमधून रशियन सैन्याने तात्काळ माघारी फिरावं तसच युक्रेनमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांती आणि युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाची जबाबदारी आहे.