टवाळखोरांकडून थेट केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, धक्कादायक प्रकार
Union Minister's daughter molested by deserters, shocking incident

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या तरुणांना तातडीने पोलिसांनी अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षा रक्षक त्यांच्या परिवारासोबत कोथळी गावाची यात्रा बघण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुण त्यांच्या परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला.
या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही तरुणांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट झाल्याची माहिती मिळत आहे.
छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत.
छेडखानी करणाऱ्या मुलांना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी रक्षा खडसे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
पोलिसांच्या सोबत मंत्री रक्षा खडसे चर्चा करत आहेत. या तरुणांना अटक झालीच पाहिजे. माझं एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार?
असा सवालही त्यांनी पोलिसांना विचारला. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल राज्यात तर सर्वसामान्यांच्या मुलींबाबत सरकारचं नेमकं धोरण काय आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते. या दिवशी विविध कार्यक्रम असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही येथे फराळ वाटप करत होती.
यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता, त्यानंतर रक्षा खडसे यांच्या कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली.
यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती,
त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला. व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु त्याने सुरक्षारक्षकाशी झटापट केली.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी उपस्थित करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही यात्रेत गेली होती,
यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले. याबाबत शंका येताच सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला.
परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावे केली. या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलंय. म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी टवाळखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही दिल्याची माहिती मंत्री रक्षा खडसेंनी यावेळी दिली आहे.
आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते. या दिवशी विविध कार्यक्रम असतो. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही फराळ वाटप करत होती.
दरम्यान यावेळी देखील भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर कृषीका काही यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली.
यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. त्या ज्या पाळण्यामध्ये बसत होत्या, त्याच पाळण्यामध्ये तो सुद्धा बसला आणि काही व्हिडिओ चित्रित केले.
ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येतात त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु तो त्याच्या अंगावरती गेला.
या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. या तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, आज एका मंत्र्याची, खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? याबाबत मी मुख्यमंत्र्यांची ही चर्चा केली आहे. असे त्यांनी सांगितले.