डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशावर किती टक्के कर आकारला?
What percentage of taxes did Donald Trump impose on which country?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातल्या देशांवर आयात कर लागू केला आहे. सर्व देशांवर सरसकट १० टक्के कर लागू केले असून काही निवडक देशांवर Resiprocal Tariff लागू करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी
बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार भारतावर २६ टक्के व्यापार कर लागू झाला असून चीनवर हेच प्रमाण ३४ टक्के तर व्हिएतनामवर ४६ टक्के इतका व्यापार कर लागू करण्यात आला आहे. हे प्रमाण प्रत्येक देशाच्या बाबतीत वेगवेगळं असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “भारताच्या पंतप्रधानांचा नुकताच दौरा आटोपला. ते माझे खूप चांगले मित्र आहेत.
पण मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही चांगले मित्र आहात, पण तुम्ही आम्हाला चांगली वागणूत देत नाही’. ते आपल्यावर ५२ टक्के व्यापार कर आकारतात. पण आपण मात्र त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास शून्य कर आकारत आलो”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, या अतिरिक्त करआकारणीचं डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. “मी या धोरणाला दयाळू समन्यायी व्यापार कर असं म्हणेन. हे खरंतर पूर्णपणे जशास तसे कर नाहीत.
आम्ही त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराचे दर फक्त निम्मे केले आहेत. त्यांना अडचण असेल तर त्यावरचं उत्तर खूप सोपं आहे. जर तु्मची काही तक्रार असेल,
जर तुम्हाला हे व्यापार कर शून्य हवे असतील तर तुम्ही तुमची उत्पादनं थेट अमेरिकेत तयार करा. इथे कोणतेही व्यापार कर नाहीत”, असं डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर ३४ टक्केतर व्हिएतनामवर तब्बल ४६ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केला आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारताला चीन व व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो.
याशिवाय, थायलंडवर ३६ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के कर लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर याचा भारताला एका अर्थाने फायदाच होणार असल्याचं बोललं जात असलं, तरी इतर आशियायी देशांपेक्षा भारतावर लागू केलेला व्यापार कर जास्त आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या निर्णयाची झळ आता भारताच्या सोन्याच्या दरावरही बसली आहे. आधीच 93 हजारांच्या घरात गेलेल्या सोन्याचे दर मध्यरात्रीतून 700 रुपयांनी वाढून थेट 94700 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धारेणाच्या निर्णयामुळे ही वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही तासात किंवा काही दिवसात सोन्याचे भाव 95000- 97 हजारांवर पोहोचू शकतात असा अंदाज जळगावच्या सोने व्यवसायिकांकडून व्यक्त केला जातोय.
दरम्यान, सोन्याच्या वाढत्या दरात ग्राहक वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. सोन्याचे दर आवाक्याबाहेर जात असल्यानं ग्राहकही सध्या सोनं खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या वाढत्या दरानं चिंता व्यक्त केली जात आहे.एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर 93 हजार 500 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 1 लाख 2 हजारांवर गेलाय.
जागतिक स्तरावर झालेली अनिश्चितता तसेच मुख्यत्वे अमेरिकेचे टॅरिफ धोरण वाढत्या सोन्याच्या किमतींना कारणीभूत असल्याचं बाफना ज्वेलर्सचे संचालक सुनील बाफना यांनी सांगितलं. तर दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकांचं बजेट कोलमडले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही धोरणांचा थेट सोन्याच्या दरावर परिणाम पडत आहे. सोन्याचे दर वाढत असले तरी देखील सोन्याकडे एक शाश्वत गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितलं जाते.
परिणामी ग्राहकांकडून सोन्याची विक्री कुठेही कमी झालेली नाही. मात्र, सर्वसामान्यांकडून वाढत्या सोन्याच्या दरवाढीवर चिंताजनक प्रतिक्रिया येत आहेत.
लग्नसराईच्या काळात खास जळगावात जाऊनही अनेक जण सोनं खरेदी करतात. मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी किंवा एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोनं खरेदी ही सातत्याने केली जाते.
विशेष म्हणजे गरीब घरचा माणूसही मनी-मंगळसूत्र घ्यायचं म्हणून तरी सोनं खरेदी करतोच. मात्र, हेच सोनं आता खिशाला परवडत नसल्याचं ग्राहक सांगतायत.
अमेरिकेला शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा काल (बुधवारी 2 एप्रिल) रात्री उशिरा केली.
त्यानुसार भारतावर 26 टक्के आयात शुल्क लादण्यात येणार आहे. या निर्णयाचा परिणाम देशातील म वस्त्रोद्योग, परिधान क्षेत्र आणि ज्वेलरी या क्षेत्रावर होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.