मनसेच्या नेत्याला फोनवरून धमकी,तुझी औकात नाही,…

MNS leader threatened over phone, "You have no authority,...

 

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकी दिल्याप्रकरणी दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास देशपांडेंना अज्ञाताने फोन करुन शिवीगाळ केली होती. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आली आहे.

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेने केली होती. तर भय्या आमच्या पक्षाची मान्यता रद्द करणार असतील, तर त्यांना मुंबई राहू द्यायचं की नाही, हे आम्ही बघू, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतली. त्यानंतर ही धमकी आल्याचा आरोप आहे.

 

आरोपी : हॅलो, शिवी कशाला देताय?
संदीप देशपांडे : अरे XXXXX तू शिवी दिलीस ना पहिली मला
आरोपी : जाऊदे तुझी औकात नाही तेवढी

 

संदीप देशपांडे : तुझी औकात आहे का रे भैया
आरोपी : भैया कोणाला म्हणतो रे
संदीप देशपांडे : चल तुझा पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहतो

 

आरोपी : तिकडेच येतो ना मी
संदीप देशपांडे : माझ्या घरी येतोस? ये.. बघुया तुझ्यात हिंमत किती आहे
आरोपी : हा बघतो ना मी पण

 

संदीप देशपांडे : ए जा रे भैया
आरोपी : एक सीट निवडून आणून दाखव

 

 

काल रात्री सव्वादहा वाजता मी घरी असताना फोन आला आणि नुसताच शिव्या घालत होता. नंतर पुन्हा एकदा फोन केला. त्याला म्हटलं मी कॉल रेकॉर्ड करतोय.

 

त्यावेळीही तुम्हाला घरी येऊन मारु वगैरे.. या असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. काल रात्री ११ वाजता मी पोलिसात गेलो आणि एनसी दाखल केली.

 

जाणीवपूर्वक मुंबईचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. माझं राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून त्यांना कल्पना दिल्याचंही ते म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *