11 वर्षांचा मुलगा उष्माघाताचा पहिला बळी ;काळजी घ्या

11-year-old boy becomes first victim of heatstroke; take care

 

 

 

राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पारा ४० पार गेला आहे.अशातच बुलडाण्यामध्ये उष्माघातामुळे एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं ही घटना घडली आहे. संस्कार सोनटक्के (वय११) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

 

शेगावमधील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये संस्कार सोनटक्के हा इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. संस्कारला उन्हाचा फटका बसला. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.

 

त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात होते.

 

पण वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संस्कारच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

 

सध्या उन्हाची तीव्रता ही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण देखील वाढले आहेत. तापमान वाढल्यामुळेच उष्माघाताची रुग्ण वाढतात हे आपल्याला माहीतच आहे.

 

त्यामुळे कुठलेही काम करायचे असल्यास किंवा उन्हामध्ये बाहेर फिरायचे टाळल्यास आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

 

खूपच महत्त्वाचे काम असेल तर सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी चार ते त्यापुढील वेळेमध्ये आपण ते काम करू शकतो.

 

जर आपल्याला ताप आली चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी असेल खूप घाम येत असेल बेचैन अस्वस्थता वाटत असेल तर घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात दाखवावे.

 

उष्माघात हा काही फार मोठा गंभीर आजार नाही मात्र आपल्या दुर्लक्षामुळे उष्माघात होऊ शकतो. तीव्र ऊन असताना घराबाहेर जाणे टाळणे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

 

याचबरोबर आपल्याला ताप जाणवत असल्यास तापीची पॅरासिटॅमल ही टॅबलेट घेऊ शकतो. त्याचबरोबर घाबरट अस्वस्थता वाटत असेल तर झाडाच्या सावलीमध्ये आराम करू शकतो.

 

शारीरिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल तर शक्यतो उन्हामध्ये काम करणं टाळावं. यामुळे घबराट बेचैनी अस्वस्थता वाढवून उष्माघाताचा त्रास आणखी वाढू शकतो.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *