‘हे’ पुरावे न दिल्यास रेशन कार्ड होणार रद्द
Ration card will be cancelled if 'this' evidence is not provided

‘अंत्योदय’, ‘केशरी’ आणि ‘पांढऱ्या’ शिधापत्रिका असलेल्या शिधापत्रिकाधारकांपैकी ‘अपात्र’ असणाऱ्या कुटुंबीयांचा शोध घेण्याची मोहीम अन्न व नागरीपुरवठा विभागाने हाती घेतली आहे.
ही मोहीम सुरू झाली असून, येत्या ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. शिधापत्रिकाधारकांना रहिवाशांचा पुरावा देणे बंधनकारक आहे. पुरावा न दिल्यास त्या कुटुंबीयांची शिधापत्रिका अपात्र अथवा रद्द करण्यात येणार आहे. त्याबाबत सरकारने आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारकडून मोफत धान्य योजनेंतर्गत राज्यातील विविध उत्पन्न असलेल्या घटकांना योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी अंत्योदय, केशरी आणि पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांचे प्रकार निश्चित करण्यात आले आहेत.
त्या शिधापत्रिकाधारकांना धान्य मोफत देण्यापूर्वी माहिती द्यावी लागणार आहे. त्याचा कोटा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या संख्येच्या आधारे कोटा निश्चित करण्यात आला आहे.
त्याच पद्धतीनुसार प्रत्येक जिल्ह्यातील धान्याचा कोटा ठरविण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या लाभार्थ्यांचा कोटा वाढवून घेता यावा; तसेच त्यांना त्या योज़नेंतर्गत सामावून. घेता यावे यासाठी अपात्र लाभाथ्यांची शोध मोहीम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहर, ग्रामीण भागातील स्वस्त धान्य विक्रेत्यांकडे अर्ज उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्या अर्जासोबत शिधापत्रिकाधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे.
या शोध मोहिमेत एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका तसेच एकाही विदेशी नागरिकाला शिधापत्रिका दिली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
शिधापत्रिकाधारकांनी अर्ज जमा केल्यानंतर विक्रेत्यांनी हे अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे द्यायचे आहेत. त्या ठिकाणी अर्जाची तपासणी केली जाईल.
अर्ज जमा करताना रहिवाशाचा पुरावा दिलेले आणि न देणारे अशा दोघांची स्वतंत्र यादी द्यावी लागणार आहे. पुरावा उपलब्ध शिधापत्रिकाधारकांना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.
मुदतीत पुरावा सादर न केलेल्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका देताना व्यक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार नवीन शिधापत्रिका देण्यात यावी, अशाही सूचना केल्या आहेत.
अर्जासोबत रहिवासाचा पुरावा म्हणून भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, गॅस जोडणी क्रमाकांची पावती, बँकेचे पासबुक, विजेचे बिल, फोन मोबाइल बिल, वाहन परवाना, कार्यालयीन; तसेच अन्य ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी एक दाखला द्यावा लागणार आहे.
सरकारच्या सूचना
तपासणी करताना ज्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांकडे पिवळी, केशरी शिधापत्रिका असेल आणि उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांची शिधापत्रिका रद्द करावी.
उत्पन्नानुसार त्यांना नवीन शिधापत्रिका द्यावी.
दुबार; तसेच अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, मृत व्यक्तींना लाभाथ्यांच्या यादीतून वगळावे.
छाननी वेळी संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत पोलिसांकडून तपासणी करावी.
खोटी माहिती आणि कागदपत्रे सादर करून मिळविलेल्या अपात्र शिधापत्रिका धारकांची शोधमोहीम अन्नधान्य वितरण कार्यालयाने हाती घेतली आहे.
येरवडा परिमंडळ ‘ई’ विभागाकडून ३२ हजार शिधापत्रिकाधारकांच्या कागदपत्रांचीही फेरपडताळणी मोहिम सुरू केली आहे.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची खोटी माहिती, दुबार आणि मयत शिधापत्रिका रद्द केल्या जाणार आहेत. रास्तभाव दुकानदारांची बैठक आज (शुक्रवारी) येरवडा परिमंडळ कार्यालयात पार पडली. त्यावेळी याबाबत सूचना देण्यात आल्या.
पडताळणीनंतर काय होणार?
५९ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याना धान्य मिळणारे केशरी कार्ड मिळणार
५९ हजार ते एक लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना केशरी कार्ड मिळणार, परंतु धान्य मिळणार नाही
पिवळे आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील सुमारे एक लाख आठ हजार नागरिकांना रास्त भावात धान्य मिळते
अपात्र रेशन कार्डधारकांचे नाव रद्द केल्यानंतर त्या जागी नव्या पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळेल.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार शहरात अपात्र लाभार्थी शिधापत्रिका शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
३१ मेपर्यंत पिवळे, केशरी आणि पांढऱ्या रेशनकार्ड धारकांची तपासणी करून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येतील, रेशन दुकानातून एप्रिल महिन्याचे धान्य घेणाऱ्या लाभाथ्यर्थ्यांना दुकानदार अर्ज वाटतील,
त्यांनंतर अर्ज जमा करताना मागील वर्षभरातील रहिवासी पुरावा आणि उत्पन्नाचे हमीपत्र रेशनकार्ड धारकांना द्यावे लागेल. या कागदपत्रांची तपासणी होऊन खोटी माहिती आढळून आल्यास शिधापत्रिका रद्द होईल.