भर उन्हात गाडी थांबवून पवार बापलेकीची चर्चा ,शरद पवार खळखळून हसले
Pawar stopped the car in the hot sun and discussed his father-in-law, Sharad Pawar burst out laughing

पायाला भिंगरी लावून फिरणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे. शरद पवार सातत्यानं दौऱ्यावर असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात.
बारामती शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बारामतीच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांशी यांची त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत भेट झाली.
विशेष म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेदेखील वडिलांप्रमाणेच दौऱ्यावर होत्या. वडिलांची भेट घेण्यासाठी लेकीनं वाहनांचा ताफा थांबवला. यानंतर काही वेळ रस्त्यातच बापलेकीच्या गप्पा रंगल्या. यावेळी शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभादेखील होत्या.
बारामतीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूरचा दौरा आटपून त्या पुरंदरच्या दिशेनं निघाल्या. त्यावेळी शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्यासह बारामतीच्या दिशेनं निघाले होते.
त्यावेळी बापलेकीची मोरगावाजवळ भेट झाली. वडिलांची रस्त्यात भेट घ्यायची असल्यानं सुळेंनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवला. त्यानंतर त्या कारमधून उतरुन रस्ता ओलांडून वडिलांच्या भेटीसाठी गेल्या. त्यावेळी शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभादेखील होत्या.
आधी कारच्या उजव्या बाजूला उभ्या राहून गप्पा मारणाऱ्या सुप्रिया सुळे काही मिनिटांमध्ये कारच्या डाव्या बाजूस गेल्या. शरद पवार त्याच बाजूला बसलेले होते.
यानंतर बापलेकीच्या गप्पा मारल्या. शरद पवारांनी सुळे यांच्याकडून दौऱ्याची माहिती घेतली. सुळे बोलतच सुटल्या होत्या. काही वेळानंतर शरद पवार खळखळून हसले. वडिलांशी बोलून झाल्यावर सुळे पुरंदरच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. तर शरद पवार पत्नीसह बारामतीच्या दिशेनं रवाना झाले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अचानक रस्त्यात झालेली गाठभेट चर्चेचा विषय ठरली. सुळे वडिलांशी गप्पा मारत असताना दोघांचे सुरक्षारक्षक रस्त्यावर वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घेत होते. कडाक्याच्या उन्हात झालेल्या बापलेकीच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.