दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना वाचवण्यासाठी सय्यद आदिल छातीची ढाल करून दहशतवाद्यांसमोर , त्यालाही गोळ्या घातल्या

Syed Adil used his chest as a shield to protect tourists during a terrorist attack, he was also shot

 

 

 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.

 

या घटनेत स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह याच्यावर देखील दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. सय्यद आदिल हुसैन शाह पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करत होता.

 

दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल शाह यानं धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला.

 

आदिल हुसैन घोड्यावरुन पर्यटकांना सफर घडवायचा. त्यानं एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. सय्यद आदिल हुसैन शाह पर्यटकांना कार पार्किंग पासून बैसारन म्हणजेच मैदानापर्यंत घेऊन जायचा.

 

सय्यद आदिल हुसैन शाह यानं दहशतवाद्यांची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली. आदिल हुसैन शाह यानं त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

 

रिपोर्टनुसार आणि सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या कुटुंबामध्ये पैसे कमावणारा तो एकमेव व्यक्ती होती.

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 व्यक्तींचा मृत्यू झाला ज्यात दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. पहलगामच्या घटनेत मृत्यू झालेला सय्यद आदिल हुसैन शाह एकमेव व्यक्ती होती.

 

त्याच्या पश्चात कुटुंबात वयस्कर आई वडील, पत्नी, मुलं आहे. सय्यद आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबीयांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

 

आदिल शाहचे वडील, सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी संवाद साधला, ते म्हणाले माझा मुलगा काल पहलगाममध्ये काम करण्यासाठी गेला होता.

 

दुपारी तीनच्या सुमारास आम्हाला तिथं हल्ला झाल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला मात्र त्याचा फोन स्विच ऑफ होता. सायंकाळी 4.40 वाजता त्याचा फोन सुरु झाला मात्र त्यावेळी कुणीच उत्तर दिलं.

 

आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा आम्हाला सय्यद आदिल हुसैन शाह याला देखील गोळी लागल्याची माहिती मिळाली. सय्यद हैदर शाह यांनी ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं म्हटलं.

 

या घटनेनंतर परिसरात शोकाकूल वातावरण आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आदिल शाह यानं स्वत:ची पर्वा न करता दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचं धाडस आणि शौर्य नेहमीच लक्षात ठेवलं जाईल, असं स्थानिकांनी म्हटलं.

 

दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे.

 

मृतांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात काही लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पहलगाम दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये दोन पुण्याचे, तीन डोंबिवलीचे आणि एक पनवेलचा रहिवासी आहे. पुण्यातील मृतांची ओळख संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गंबोटे अशी झाली आहे.

 

डोंबिवली पश्चिमेकडील तीन मृत पर्यटकांची ओळख पटली आहे. त्यांची नावे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व पर्यटक शनिवारी त्यांच्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते.

 

डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी अतुल मोने, डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान परिसरातील रहिवासी हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरातील रहिवासी संजय लेले हे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत गेले होते.

 

याशिवाय, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये मुंबईतील बालचंद्रन आणि शोभित पटेल यांची नावे समोर आली आहेत. जखमींमध्ये आसावरी जगदाळेंचा सुद्धा समावेश आहे. आसावरी यांनी अत्यंत थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला आहे.

 

आसावरी जगदाळे यांच्या वडिलांना सुद्धा गोळी लागली असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

 

त्या म्हणाल्या की, आम्हाला प्रचंड भीती वाटत आहे, कुठं काय होईल याची भीती आम्हाला वाटत आहे. सगळीकडे आर्मी असते, नाका नाक्यावर चेकपोस्टस् आहेत,

 

पण जिथं गरज होती तिथं मदतीसाठी आम्हाला आवाज द्यायला कोणीच नव्हतं. ना पोलिस, ना मिलिटरी होती, त्यांनी रेस्क्यू केलं. ते कर्तव्य आम्ही आमच्यांना गोळ्या लागताना पाहिलं.

 

असावरी यांनी सांगितलं की, तुम्ही बसून ऐकत आहात, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय आम्ही काय पाहिलं आमचं आम्हाला माहिती आहे. त्या म्हणाल्या की, मला एकाच गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतंय की हिंदू मुस्लीम वादामध्ये जी सामान्य लोक एकमेकांना हिंदू मुस्लीम भाऊ बहिण अशा नात्याने राहतात किंवा घट्ट मैत्री असते.

 

या दोन धर्मातील काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतं. या वादामुळे सामान्य लोकांनी का फेस करावं? आम्ही पैसे देऊन फिरायला आलो होतो,

 

अशा ठिकाणी आम्ही येऊन थांबलो आमच्या हातात काहीच नाही. आम्हाला लवकरात लवकर सरकारकडे पोहोचण्यात यावं ही आमची सरकारकडे मागणी आहे. राजकारणाशी आमच्या भावनांशी खेळू नका.

 

दरम्यान, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन हे घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि देश आणि जगभरातील पर्यटकांमध्ये ते एक आवडते ठिकाण आहे.

 

अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळी सशस्त्र अतिरेकी आले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या, खेचरांवर स्वार होणाऱ्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार केला.

 

पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी संघटना, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

 

पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

 

या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

 

दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे,

 

असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

 

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असून, राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

 

पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळेल, दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

 

मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली,

 

जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून हल्ल्याबाबत माहिती घेतली आहे. आम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये सरकारसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, अतुल मोने या सहा जणांचा मृत्यू झाला होता. आज त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात आणले जाणार आहे.

 

यापैकी ४ पर्यटकांचे पार्थिव मुंबईत तर २ पार्थिव पुण्यात पाठवले जाणार आहेत. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी मदतही जाहीर केली आहे.

 

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.

 

जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

 

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री आशिष शेलार समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. तर, मंत्री गिरीश महाजन हे स्वतः घटनास्थळी (श्रीनगर) जात आहेत.

 

तसेच राज्यातील पर्यटकांसाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष विमानासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

 

पहलगाममध्ये असलेले पर्यटक सुखरूप असले तरी ते चिंतेत आहेत. मंत्रालयातील वॉर रूमच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जात आहे. जम्मू-कश्मीर प्रशासन या कामात पूर्ण सहकार्य करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

या दुर्घटनेत जे पर्यटक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनाही महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल. जर कुणाला त्याआधी परत यायचे असेल, तर त्याचीही व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *