अण्णा हजारे पेटून उठले ,म्हणाले आम्ही हातपाय बांधून बसलो नाही

Anna Hazare got up in anger and said, "We are not sitting with our hands and feet tied."

 

 

 

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू नदी करार रद्द केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

 

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना भारत सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले.
भारताने पाणी बंद करून पाकिस्तानचे नाक दाबले आहे, आता त्यांचे तोंड उघडेल.

 

नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी पाकिस्तानवर टीका केली. तसेच,पाकिस्तानकडून येणाऱ्या धमक्यांवरही त्यांनी सडेतोड भाष्य केलं.

 

पाकिस्तान म्हणतंय आम्ही अणुबॉम्ब टाकू, पण आम्ही हातपाय बांधून बसलेलो नाही. समाजाच्या प्रश्नांसाठी लढणारे आम्ही आहोत, झुकणं आमच्या स्वभावात नाही, असे हजारे म्हणाले.

 

अण्णा हजारे म्हणाले, देशातील काही शक्तींना शांतता,एकोप्याचे वातावरण खपवत नाही, म्हणूनच ते अशा खोडसाळ आणि क्रूर कृत्यांना प्रवृत्त होतात. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत.

 

मात्र आपण घाबरून जायचं नाही. देशाने एकत्र येऊन अशा हल्ल्यांचा विरोध करायला हवा… आजही देशविरोधी शक्तींविरोधात लढणारे आपले सैनिक सज्ज आहेत आणि त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे.

 

या प्रसंगी बोलताना अण्णा हजारे यांनी 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणीही सांगितल्या आहेत. त्यावेळी मी काश्मीरमध्ये होतो.

 

आमच्या सैन्यतुकडीवर पाकिस्तानी लढवय्या विमानांनी हल्ला केला होता. त्यात अनेक जवान शहीद झाले होते आणि माझ्याही डोक्याला गंभीर जखम झाली होती.

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *